करमाळा भाजपाचा महावितरण विरोधात आंदोलनाचा इशारा; तहसिलदारांकडे दिले लेखी निवेदन
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने गुरुवार दिनांक २८/१०/२०२१ रोजी शेलगाव वांगी चौक, जेऊर रोड येथे शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज एक तासा वरून आठ तास व सुरळीत करण्यात यावी. तसेच शेतीपंपाचा वीज पुरवठा उच्च दाबाने देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील निवेदन मा. तहसीलदार साहेब यांना देण्यात आले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दीड वर्षांपासून कोरोना महामारी मुळे अगोदरच शेतकऱ्यांचा शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना आपला शेतमाल कवडीमोलाने विकावा लागला आहे. आत्ता शेतीला पाणी आहे परंतु विजेअभावी शेतकऱ्यांची पिके जळू लागली आहेत. त्यामुळे शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यात यावा. अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी या रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ही त्यांनी केले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे करमाळा तालुका अध्यक्ष गणेश भाऊ चिवटे, भगवान गिरी गोसावी, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय पोटे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सागर सरडे, जिल्हा चिटणीस अमोल पवार, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष दादासाहेब पाटक, ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष धर्मराज नाळे, आजिनाथ सुरवसे, दादासाहेब काळे, विशाल घाडगे, जयंत काळे पाटील, हर्षद गाडे, गणेश जाधव, वसीम सय्यद आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




