-->
करमाळासामाजिक

वाघजाई माता मंदिरात शारदीय नवरात्री उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न

 

कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

वडगाव शिंदे, ता. हवेली येथील जागृत शारदीय नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात सुरू असून शारदीय नवरात्रो महोत्सवाच्या निमित्ताने नव दिनात्मक महा नवचंडी याग आयोजित करण्यात आला असल्याचे आनंद आखाडा हरिद्वार, वाघजाई माता सेवा संस्था चे अध्यक्ष महंत गिरीजानंद सरस्वती महाराज यांनी सांगितले.

ध्वजपूजन, गौ पूजन यांच्या पूजनाने नवरात्री महोत्सवास सुरुवात करण्यात आली असुन मागील आठ दिवसांपासून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात येते. यामध्ये देवी अभिषेक, सप्तशती पाठ व हवन, कुंकुम अर्चम, पूर्णाहुती, सायंकाळी ०६:०० ते ०७:०० या वेळेत श्रीमंत देवी भागवत कथा व नंतर महाआरती या प्रमाणे याठिकाणी रोज कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येत आहेत. तसेच या ठिकाणी करण्यात येणाऱ्या होमा साठीचे पौरोहित्य बालाजी कुलकर्णी महाराज व गजानन मोडक करत आहेत. नुकतेच एका भक्ताच्या वतीने वाघजाई माता मंदिरासाठी मोठा घंटा देण्यात आला आहे. तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी फराळा चे वाटप करण्यात येत आहे. यासाठी सर्व नियोजन व व्यवस्थापन श्री. वाघजाई माता सेवा संस्था, वडगाव शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

यावेळी वडगाव शिंदे – काकडे च्या सरपंच हेमलता विलास शिंदे, उपसरपंच उषा काकडे,
ग्रामपंचायत सदस्य शिवानी शिंदे, उल्का शिंदे, दिपाली शिंदे, योगिता शिंदे, युवराज काकडे, बाळासाहेब शिंदे, अनिल काकडे, उद्योगपती कल्याण शिंदे, विलास शिंदे, माजी सरपंच विजय शिंदे, ऋषी शिंदे, भरत काकडे, रमेश काकडे, राम काकडे, सुनिल काकडे, बाबुराव काकडे , भिमराव शिंदे, सर्जेराव शिंदे, सतिश शिंदे, तुकाराम शिंदे, माऊली शिंदे, गुलाब शिंदे, कांतिलाल शिंदे, संतोष काकडे, सोमनाथ काकडे, विश्वास काकडे, मच्छिंद्र शिंदे, पप्पू शिंदे, स्वप्निल शिंदे, अजय शिंदे, विशाल शिंदे, सन्मान शिंदे, विजय शिंदे, संभाजी शिंदे, दत्तात्रय शिंदे, सुशील शिंदे, नितीन शिंदे, किरण शिंदे, गणराज शिंदे, वैभव शिंदे, दिपक शिंदे सरकार, समाधान शिंदे, नितीन काकडे तसेच वडगांव शिंदे व परिसरातील ग्रामस्थ यासाठी सेवा देत आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close