श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम या ठिकाणी वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील श्री उत्तरेश्वर जुनियर कॉलेज या ठिकाणी आज वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व गझलकार श्री. नवनाथ खरात, केम ग्रामपंचायत चे सन्माननीय सदस्य श्री. अनंता तळेकर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. मोहन आबा दौंड तर अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. विष्णू कदम हे उपस्थित होते.
यावेळी प्रथम परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. अब्दुल कलाम यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री उत्तरेश्वर जुनियर कॉलेज मधील विद्यार्थी श्री. आनंद कोरे, कु. निशा डांगे, कु. संध्या वायभासे, कु. भाग्यश्री म्हेत्रे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे श्री. नवनाथ खरात सर यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनातील आदर्शवाद सांगून विद्यार्थ्यांना आपले आदर्श ध्येय गाठण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी विविध ग्रंथातील उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले. या नंतर श्री. अनंता तळेकर यांनी आपल्या मनोगतात या कॉलेजच्या उपक्रमा बद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य कदम सर यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती व वाचनाचे महत्त्व समजावून सांगितले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे श्री. नवनाथ खरात व श्री. अनंता तळेकर यांनी कॉलेज मधील विद्यार्थ्यांच्या ग्रंथासाठी प्रत्येकी पाचशे रुपये वर्गणी दिली.
यावेळी या कार्यक्रमास प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा. संतोष साळुंखे, प्रा.संतोष रणदिवे, प्रा. अमोल तळेकर, श्री सरफराज मोमीन सर हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कल्याणी राऊत व कु. पुजा वायभासे हिन केले तर या कार्यक्रमाची प्रस्ताविका कु. नर्मदा शिंदे हिने केले आभार सोमनाथ देवकर यानी मानले.



