हवेली प्रतिनिधी/प्रवीण शेंडगे


हवेली : थेऊर ते कोलवडी मार्गावर रस्ता खचल्याने नागरीकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. थेऊर फाटा ते लोणीकंद रस्ता रुंदीकरणाचे काम संथ गतीने चालू आहे. पुणे-सोलापूर रोड ते पुणे-नगर रोडला जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्याने दररोज अनेक अवजड वाहने थेऊर, कोलवडी, केसनंद, लोणीकंद, मार्गे जात असतात. थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचे वॉल कंपाऊंड लगत रस्ता गेल्याने एका ठिकाणी वॉल कंपाऊंड ची भिंत कोसळली आहे. त्यामुळे शेजारून जाणारा रस्ता हा खचला आहे.
ही घटना समजताच लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी सर, थेऊर पोलिस चौकीचे सहाय्यक पोलीस श्रीशैल चिवडशेट्टी, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तसेच साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे मा. संचालक आप्पासाहेब काळे यांनी पाहणी केली.
यावेळी क्षणाचाही विलंब न करता वाहतूक विभागाचे कर्मचारी पोलीस नाईक उमेश ढाकणे, म्हेत्रे, पो. कॉ. जमदाडे, पो. शिपाई कांबळे, पवार, कांबळे यांनी बॅरीगेट लावून वाहतूक सुरळीत केली. यावेळी यशवंत चे माजी संचालक आप्पासाहेब काळे यांनी कॉन्ट्रॅक्टरशी चर्चा करून रस्त्याचे काम चालू करण्यास सांगितले.




