-->
करमाळासामाजिक

केम-टेंभुर्णी-कुर्डूवाडी एस टी सुरू कराव्यात; शिवसेना महिला आघाडी अध्यक्षा वर्षा चव्हाण यांची मागणी

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या केम-टेंभूर्णी व केम- कुर्डुवाडी या एस टी बसेस सुरू कराव्यात अशी मागणी करमाळा शिवसेना महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा वर्षा चव्हाण मॅडम यांनी कुर्डुवाडी आगाराकडे केली आहे.

केम हे गाव करमाळा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेले गावं असून या गावात ५ माध्यमिक शाळा आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव ही कमी होत आला आहे. सध्या एस टी गाड्या बंद असल्याने प्रवाशांची व विद्यार्थीची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. ०४ ऑक्टोबर पासून शाळा सुरू झाली आहे. परंतु, केम येथे माध्यमिक शिक्षणासाठी उपळवटे, सातोली, मलवडी, भोगेवाडी येथील विद्यार्थी येतात. या विद्यार्थ्यांची विशेषत: मुलींची एस टी चालू नसल्यामुळे गैरसोय होत आहे. त्यामुळे यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. टेंभूर्णी केम एस टी सुरू केल्यास या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. तरी कुर्डुवाडी आगाराने केम दहिवली मार्गे टेंभूर्णी एस टी आणि कुर्डुवाडी, केम, भोगेवाडी मार्गे पूर्वींप्रमाणे सुरू कराव्यात अशी मागणी शिवसेना महिला आघाडी करमाळा तालुका अध्यक्षा वर्षाताई चव्हाण यांनी कुर्डुवाडी आगारप्रमुख यांच्याकडे केली आहे.

सध्या सोलापूर, पुणे, अकलूज, इंदापूर, पंढरपूर आदि ठिकाणी जायचे म्हटले तर कंदर किंवा टेंभुर्णी ला कोणाला तरी मोटार सायकल घेऊन सोडवायला घेऊन जावे लागते. त्यासाठी दोनशे रूपयाचे पेट्रोल गाडीत टाकावे लागते. ज्या एस टी ने तीस रूपयात टेंभुर्णी ला जाता येते त्याला दोनशे रूपये घालावे लागतात. अशी अवस्था प्रवाशांची झाली आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने एस टी बस सुरू कराव्यात. अगोदर कोरोना काळामध्ये शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता एस टी अभावी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. तरी या सर्व बाबींचा विचार करून केम टेंभुर्णी, कुर्डूवाडी केम या नेहमीच्या एसटी बस सुरू कराव्यात असी मागणी चव्हाण मॅडम यांनी केली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close