पार्श्वगायक प्रविणकुमार अवचर यांचा ‘या’ कारणामुळे श्री देविचामाळ ग्रामपंचायत तर्फे सत्कार
करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील मांगी गावचे सुपुत्र “करमाळ्याची कमलाई माता” या गीताचे गायक, गितकार, संगीतकार, करमाळ्याचे पार्श्वगायक प्रविणकुमार अवचर यांनी नवरात्री निमीत्त करमाळ्याची कुलस्वामिनी आई कमला भवानी मातेचा महिमा सांगणारे अभ्यासपूर्ण व दर्जेदार गीत बनवले आहे. या गीतासाठी पुणे, मुंबई येथील नामवंत वादकांकडून हे गीत त्यांनी संगीतबद्ध केले आहे. यासाठी विशेष माहिती सहकार्य श्री. विशालशेठ राठोड, नारायण सोरटे, दादा पुजारी, अशोक घाटे आदींचे मोलाचं सहकार्य लाभले. हे गीत अतिशय दर्जेदार व कमी वेळात खूप लोकप्रिय झालेबद्दल
श्री देवीचा माळ ग्रामपंचायतीच्या वतीने पार्श्वगायक श्री. प्रविण अवचर यांचा विशेष सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी त्यांचे सहकारी प्रफुल्लकुमार दामोदरे व नासिरभाई कुरेशी यांचा ही सत्कार करण्यात आला.
श्री देवीचा माळ सरपंच श्री. महेश सोरटे, उपसरपंच श्री. दीपक थोरबोले, ग्रामसेवक श्री. शिंदे साहेब, जगदंब देवस्थान ट्रस्टचे अशोक गाठे यांचे सह ग्रा. सदस्य व ग्रामस्थ हजर होते.
एवढ्या वर्षामध्ये प्रथमच इतके दर्जेदार व श्रवणीय गीत
आपल्याच तालुक्यातील पार्श्वगायक प्रवीण अवचर यांनी केले आहे. काही मिनिटात पूर्ण इतिहासाला गवसनी घालून
अभ्यासपूर्ण व खूप श्रवणीय गीत बनवले आहे. तरी हे गीत त्यांचे संगीत रंग या यु ट्यूब चॅनल वरती सर्च करून सर्वांनी आवर्जून ऐकावे असे आवाहन उपसरपंच दीपक थोरबोले यांनी केले आहे.



