-->
करमाळाविशेष

राजाभाऊ तळेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक साहित्य देऊन केले स्वागत

 

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

 

करमाळा तालुक्यातील केम येथील राजाभाऊ तळेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे स्वागत शैक्षणिक साहित्याचे वाटप करून करण्यात आले. कोरोनामुळे गेले दिड वर्ष झाले शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांनचे शैक्षणिक नुकसान झाले. या बंद काळात शासनाने शाळा बंद ठेवल्या होत्या पण ऑनलाईन शिक्षण चालू होते. पंरूतु यासाठी लागणारे अँड्राईड मोबाईल गरीब विद्यार्थ्यांकडे नसल्यामुळे त्यांना मात्र या शिक्षणाचा लाभ घेता आला नाही. कोरोना कमी झाल्यामुळे राज्य शासनाने ०४ ऑक्टोबर पासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ग्रामीण भागात ई ५ वी ते १० वीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

यासाठी नियमावली तयार करण्यात आली. यामध्ये सर्व शाळेने वर्ग स्वच्छ करून साॅनिटायझरची फवारणी करावी. एका बेंचवर एक विद्यार्थी बसवावा अशी नियमावली तयार केरून केंद्र प्रमुखानी ०२ आॅक्टोबर रोजी मिंटिग घेतली. यावेळी शासनाच्या नियमावली नुसार राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज तळेकर सर यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून शाळेचे वर्ग धुऊन काढून सॅनिटायझरची फवारणी केली. सोमवारी सर्व शिक्षकानी विद्यार्थी शाळेत

आल्याबरोबर विदयार्थांचे टेंपरेचर व ऑक्सिजन लेवल तपासणी करून त्यांना वर्गात सोडले. मैदानावर विदयार्थांचे स्वागत गुलाब पुष्प देण्याऐंवजी त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून स्वागत केले. विद्यार्थाना कोरोना विषयी मुख्याध्यापक मनोज तळेकर यानी मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांसी संवाद साधला. या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे ”स्वच्छ शाळा, सुंदर शाळा” हा जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम असून त्यामध्ये ही माध्यमिक शाळा बसते. या शाळेत सर्व ऊपक्रम राबविले जातात.

 

यावेळी मुख्याध्यापक मनोज तळेकर, भारत गायकवाड बाळासाहेब देशमुख, सुरेश पवार, बाळूराम सोनवणे, दत्तात्रय पवार, वैभव यादव, शोभा लोंढे मॅडम, श्रीमती माधुरी काळे, श्रीमती ऋतुजा सरकळे मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close