माय मराठी न्युज नेटवर्क


(पुणे) – देशभरात पत्रकार बांधवांच्या हितासाठी काम करणाऱ्या भारत सरकार मान्यताप्राप्त आयडियल जर्नलिस्ट असोसिएशन पत्रकार संघटनेला २० वर्ष पुर्ण होऊन २१ व्या वर्षात पदार्पण केल्याने यानिमित्त संघटनेचे २१ वे राष्ट्रीय अधिवेशन राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रमोदजी वाचस्पती यांच्या अध्यक्षतेत व संयुक्त भारत प्रभारी अजयकुमार मिश्रा (कामोठे), प्रदेश अध्यक्ष सचिन शिंदे, महाराष्ट्र प्रदेश महासचिव आबासाहेब सूर्यवंशी (पाचोरा), महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत कदम (चाळीसगाव), कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख शिवाजी कांबळे (उस्मानाबाद), पुणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, सल्लागार समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रफुल्ल साळुंखे (चाळीसगाव विकास मंच अध्यक्ष), चित्रपट, कला व सांस्कृतिक मंच यश काळे (चाळीसगाव) यांच्या उपस्थितीत पुणे कात्रज – नऱ्हेगाव येथील वृंदावन हॉल येथे सकाळी ११ ते ३ या वेळेत पार पडले.
बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे, खडकवासलाचे आमदार भिमराव तापकीर, दौंड पोलीस निरीक्षक विनोद घुगे, नऱ्हे गावचे सरपंच सागर भूमकर यांच्या सह आयडियल जर्नलिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय महासचिव संजय पांडे, दिल्ली सचिव राजेश जैन, डॉ. ब्रजेश यदुवंशी, राष्ट्रीय संघटन मंत्री भुपेंद्र अग्रहरी, मुंबई सचिव अनिल गुप्ता, पूर्वांचाल प्रभारी मकसूद अहमद आजमी, दिल्ली सचिव राजेंद्र जैन, पूर्वांचल प्रवक्ता राजेंद्र प्रसाद रॉय, अनिल सिंग आजमगड, मानिकचंद गुप्ता आजमगड, विवेकानंद पांडे पूर्वांचाल प्रभारी, राहुल पांडे आजमगड यांच्यासह परमेश्वर सिंग अध्यक्ष नवी मुंबई, संजय चतुर्वेदी कोषाध्यक्ष महाराष्ट्र, शिक्षण सम्राट चिंतामणी पांडे (जोगेश्वरी), सातारचे जेष्ठ पत्रकार जयंत लंगडे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष गणेध जाधव, ज्येष्ठ पत्रकार कृष्णाथ चोरमले (फलटण), जेष्ठ सल्लागार वाघोले काका, हवेली तालुकाध्यक्ष प्रवीण शेंडगे, पश्चिम महाराष्ट्र संघटक मंदार तळणीकर, पुणे विभाग संघटक नितीन सिनकर, विदर्भ प्रमुख सोमेश्वर जेवडे, धारणी तालुकाध्यक्ष रशीद खान पठाण, हवेली उपाध्यक्ष विजय शेम्बडे, अंबादास ठेंगे, वाई तालुकाध्यक्ष शशिकांत शिंदे, वाई संघटक रवींद्र कुचेकर, खंडाळा तालुकाध्यक्ष सूरज साळुंखे, शंकर कदम आदी पत्रकार उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, सरस्वती पूजन व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेला माल्यार्पण करून संघटनेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी सल्लागार समिती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रफुल्ल साळुंखे, चित्रपट, कला व सांस्कृतिक मंच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी यश काळे, महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख पदी शिवाजीराव कांबळे, विधी व न्याय विभाग जळगाव – धुळे सल्लागार प्रमुख पदी ऍड राहुल जाधव (चाळीसगाव) यांच्या नियुक्तीची घोषणा करून पत्रकारितेत व संघटनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पदाधिकारी सदस्य यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
प्रसिद्ध गायक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त गायक, सुरमणी, पं. डॉ. सुधाकर तळणीकर आणि त्यांचे चिरंजीव प्रसिद्ध गायक संगीतकार मंदार तळणीकर यांनी रंगली हरिनामी पंढरी हे भक्तिगीत सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली. या अधिवेशनात संघटना वाढीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून राज्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था आशा वर्कर, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस त्यांचे संघटनेच्यावतीने कौतुक करण्यात आले.
राष्ट्रीय अध्यक्ष वाचस्पती यांनी बोलताना सांगितले की, पत्रकारांच्या हितासाठी पत्रकारांना विमा कवच, घरे, मुलांना मोफत शिक्षण, रेल्वे बस मध्ये मोफत प्रवास, कोरोना काळात मृत्यू झालेल्या पत्रकार बांधवांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत आदी सुविधा मिळाव्यात यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना संघटनेच्या वतीने मागण्यांचे पत्र दिले असून त्या संदर्भात काही दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार व संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.
यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य प्रभारी अजयकुमार मिश्रा यांनी गेल्या वीस वर्षात संघटनेने देशभरात पत्रकारांसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत महाराष्ट्र मध्ये सर्व पदाधिकारी, सदस्य यांच्या सहकार्याने संघटनेची जोरात वाटचाल सुरू असल्याचे सांगितले. राज्यातील महिला प्रकोष्ठ बरखास्त करण्यात आल्याची घोषणा केली. यापुढे संघटनेत पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेल्या सदस्यांना घ्यावे असे सांगून पुणे येथे यशस्वीपणे कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या शिवाजी कांबळे, ज्ञानेश्वर शिंदे यांचे कौतुक केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुणे जिल्हा पदाधिकारी, सदस्यांनी परिश्रम घेतले.




