करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील मांगी गावचे पार्श्वगायक प्रविणकुमार अवचर यांनी करमाळ्याची कुलस्वामिनी आई श्री. कमला भवानी चा महिमा सांगणारे खूप सुंदर असे गीत तयार केले आहे. हे गीत त्यांनी स्वतः लिहुन या गीताचे संगीतही स्वतः तयार करून मोठ्या स्टुडिओला मोठया वादकांकडून या गीताचा रिदम तयार करून हे गीत रेकॉर्ड केले. हे गीत गायक प्रविणकुमार व त्यांचे सहगायक यांनी सुरेल आवाजात सादर केले आहे. त्यामुळे गाणं सूरु होताच एकनारे श्रोते ठेका धरतात. आई कमला भवानी देवीचे अतिशय सुंदर शब्दात वर्णन केले गेले आहे.गीताची शब्दरचना ही अतिशय अभ्यास पूर्ण अशी केली असून यामध्ये श्री. कमला देवी ट्रस्ट चे पुजारी दादा पुजारी अशोक घाटे, विशाल राठोड आणि जेष्ठ नारायण पुजारी यांनी महत्वाचे सहकार्य केले आहे. त्यामुळे एक दर्जेदार असे गीत कमलाई भक्तांना व करमाळाकरांना ऐकायला मिळते आहे.
यानिमित्त करमाळ्याचे नगराध्यक्ष श्री. वैभवराजे जगताप, मंदिर ट्रस्टी राजूसेठ परदेशी, सौ. मधुरी परदेशी, सौ. भावना गांधी, श्री. घोडके, शिवसेना तालुका प्रमुख प्रवीण कटारिया, नेते संजय शिंदे, विशालशेठ राठोड यांचे हस्ते गाण्यावरती क्लिक करून लॉंचिंग करण्यात आले.
याप्रसंगी मार्केट कमिटीचे विठ्ठल क्षीरसागर, भाजप व्यापारी संघाचे जितेश कटारिया, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, सुजित तात्या बागल, पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती संतोष (दादा) कांबळे, निखिल सोरटे, सरपंच बाळासाहेब सोरटे, श्री. थोरबोले, अमोल डाडर, श्री. अमित भाऊ जाकते, ट्रस्ट पुजारी नारायण सोरटे, अशोक गाठे, सिकंदर अण्णा जाधव, मांगी येथिल पैलवान पप्पू शिंदे वस्ताद, सचिन अब्दुले सर, पत्रकार श्री. महेश चिवटे, श्री. सुहास घोलप, श्री. सचिन जव्हेरी, कुमार खाटेर बंधू , प्रसिद्ध दोस्तीबेंजो मालक अलीम भाई कुरेशी, नासिरभाई कुरेशी, करमाळा येथील गायक पत्रकार प्रफुल्लकुमार दामोदरे उपस्थित होते. यावेळी मकाई कारखान्याचे चेअरमन श्री. दिग्विजय बागल व करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन नगरसेवक श्री. कन्हैयालाल देवी हे बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी आवर्जून फोन वरती शुभेच्छा दिल्या.
करमाळा शहराचे नगराध्यक्ष श्री. वैभवराजे जगताप यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्रविणकुमार अवचर यांनी आई कमलाईच खूप दर्जेदार असे गीत बनवून कमला भवानी च्या भक्तांना या गाण्याच्या रूपातून नवरात्रीची भेटच दिली आहे. त्यामुळे आपल्या कमला भवानीचे हे गीत प्रत्येक घराघरात वाजायला हवं तसेच हे गीत तालुक्यातच नाही तर देशात व परदेशात ही आपण पोहोचवणार आहोत. यावेळी सर्व मान्यवरांनी शुभेच्छाचा वर्षाव केला.
करमाळा तालुक्यातून व शहरातून अनेक कलाकार घडले मात्र अजपर्यंत कोणीही ,कमला देवी चे गीत बनवले नव्हते , परंतु पार्शवगायक प्रविणकुमार अवचर यांनी पहिलेच दर्जेदार आणि खूप सुंदर असे कामलादेवी चे गाणे बवणुन भक्तांना व रसिकांना एक नवरात्रीची गाण्याची भेट दिली त्याबद्दल मनापासून शुभेच्छा दिल्या.
श्री. संजय शिंदे (नेते)



