-->
करमाळा

केम येथील उत्तरेश्वर मंदिरात विद्यागीरी महाराज यांची १५ वी पुण्यतिथी भक्तिभावाने साजरी

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

 

करमाळा तालुक्यातील केम येथील श्री ऊत्तरेश्वर मंदिरात मंहत जयंत गिरी महाराज यांचे वतीने विदयागिरी महाराज यांची १५ वी पुण्यतिथी मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात साजरी करण्यात आली.

या निमीत्त ह. भ. प ज्ञानेश्वर जगताप पाटील महाराज दहिवली यांचे सकाळी १०:०० ते १२:०० या वेळेत सुश्राव्य हरिकीर्तन झाले. बरोबर बारा वाजता विदयागिरी महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली व त्यानंतर आरती घेण्यात आली. या वेळी प्रशांत गिरी महाराज, निराळे महाराज, नाना महाराज, रघुनाथ गिरी गिरीश महाराज, कोळी महाराज, संजीव महाराज, गोडसे महाराज, चंदू मिस्तरी, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मा. श्री. अनिरुद्ध कांबळे उपस्थित होते. तसेच देवस्थान चे चेअरमन दादासाहेब गोडसे, सदस्य विजय तळेकर व आदि भाविक उपस्थित होते.

 

या धार्मिक कार्यक्रमासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यासाठी बंडू तळेकर, मारूती पळसकर, संजय दौंड, बंडू दौड, ऊत्तरेश्वर टोणपे, दिलीप पवार, संदिप गोडसे, देवा कासीद, नितीन पिसे राहूल कोरे, गणेश गुरव, हानुमंत राऊत, ज्ञानेश्वर तळेकर, रमेश दिक्षीत, बाळू तळेकर, दादा नवले, बबलू पाटिल, सखाराम घाडगे, ह.भ.प. मच्छिंद्र तळेकर, सुब्राव गुरव, कुंभार महाराज, आणा वळेकर यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close