-->
करमाळासामाजिक

महात्मा गांधी जयंतीनिमित्त अर्जुननगर येथे मोफत सातबारा वाटप कार्यक्रम संपन्न

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यातील मौजे अर्जुननगर येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त व भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या करमाळा महसूल विभागामार्फत गावातील सर्व शेतकऱ्यांना मोफत व घरपोच सातबारा उताऱ्याचे वाटप करण्यात आले.

मोफत सातबारा वाटप कार्यक्रमासाठी करमाळा तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार श्री. जाधव साहेब व महसूल तहसीलदार श्री. बदे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. गावात मोफत सातबारा वाटप कार्यक्रमासाठी अर्जुननगर गावाचे तसेच अर्जुननगर मंडल चे मंडलाधिकारी काझी साहेब व गाव कामगार तलाठी कसबे साहेब यांनी विशेष परिश्रम घेतले.

प्रथमता ग्रामपंचायतीच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत व सत्कार अर्जुननगर ग्रामपंचायत चे सरपंच प्रकाश थोरात व ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी प्रवीण भोगे भाऊसाहेब यांच्या हस्ते संपन्न झाला. सोबतच महसूल प्रशासनाच्या वतीने कोरोना कालावधीत कोरोना तपासणी विलगीकरण व लसीकरणात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अर्जुननगरचे सरपंच प्रकाश थोरात व ग्रामसेवक मनोज लटके यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महसूल प्रशासनाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात प्रथमच अर्जुननगर येथे मोफत सातबारा वाटप करण्यात आल्याचे नायब तहसीलदार श्री. जाधव यांनी सांगितले. तसेच गावातील महसूलच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार व मदत करणार असल्याचे श्री. बदे यांनी यावेळी सांगितले.

सदर कार्यक्रमासाठी कृषी सहाय्यक माने, मुख्याध्यापक संजू कांबळे, पोलीस पाटील रामदास पवार, सरपंच आश्विनी थोरात, उपसरपंच अभिमन्यू धुमाळ सर्व ग्रामपंचायत सदस्य व अर्जुननगर गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब आडसुळ यांनी केले. तर आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य अमोल पवार यांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close