कृषी विभागामार्फत ‘या’ गावात महाबीज सुधारित ज्वारी “फुले रेवती” या वाणाचे वाटप
प्रतिनिधी/संजय साखरे


राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०२१-२२ अंतर्गत महामंडळाचे महाबीज सुधारित फुले रेवती या जातीचे ज्वारी बियाणे पिक प्रात्यक्षिक म्हणून कृषी विभाग करमाळा यांच्यामार्फत सावडी येथे दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी कृषी सहाय्यक असिफ तांबोळी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी सावडी गावचे सरपंच भाऊसाहेब शेळके, ग्रामपंचायत सदस्य सुदाम तळेकर, यासीन भाई शेख, शकील भाई शेख, सुनील देशमुख, राम मचाले, केशव तळेकर, मनोहर नेमाने, सुभाष तळेकर, उद्धव मचाले, महावीर जाधव, शहाजी शिंदे, अमीन सय्यद, अजित सय्यद, सागर तळेकर इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
महामंडळाचे महाबीज सुधारित ज्वारी “फुले रेवती” हे वाण कमी पाण्यात व प्रतिकूल वातावरणात येणारे अत्यंत उत्कृष्ट प्रकारचे बियाणे असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत प्रति शेतकरी एक एकर क्षेत्राचे बियाणे करमाळा कृषी विभाग यांच्यामार्फत देण्यात आले. या बियाणाचा हेक्टरी उतारा देखील अतिशय चांगला आहे. ज्वारी हे आपले मुख्य अन्न असून ती अनेक आजारांवर गुणकारी असल्याने त्याचा जास्तीत जास्त वापर आपल्या जेवणामध्ये व्हावा हाच त्यामागचा दृष्टीकोण आहे असे यावेळी सांगण्यात आले.




