खेडचे सभापती अरुण चौधरी यांचा फुलगाव ग्रामस्थांकडून नागरी सत्कार
कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


सभापती पदाच्या रणसंग्रामात जे जे पदाधिकारी व लोक माझ्या सोबत होते त्यांच्या विश्वासाला कधी ही तडा जाऊन देणार नाही. तसेच भविष्यात वेळोवेळी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांना मदत करून तालुक्याचा पंचायत समितीच्या माध्यमातून चेहरामोहरा बदलण्यासाठी मी वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन खेड पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती अरुण चौधरी यांनी केले. फुलगाव, ता. हवेली येथील विठ्ठल मंदिरात नागरी सन्मानाच्या सोहळ्यात चौधरी बोलत होते.
यावेळी त्यांनी फुलगाव ग्रामस्थांशी असलेल्या नातेसंबंधाविषयी बोलताना सभापती निवडीच्या १०१ दिवसांच्या ज्वलंत प्रवासाबद्दल बोलताना भावना व्यक्त केल्या. या कठीण वेळी मला व माझ्या सोबत असलेल्या पंचायत समितीच्या सदस्यांना ज्या पाहुण्यांनी व हितचिंतकांनी मदत केली त्यांचे देखील आभार मानले. तसेच भविष्यात खेड तालुक्यातील शेवटच्या टोकाला असलेल्या गोलेगावात चांगल्या प्रतीचे व सर्व सुविधांनी युक्त हायस्कूल बांधण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अरुण चौधरी यांची खेड पंचायत समितीच्या सभापती पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल फुलगाव ग्रामस्थ, विविध कार्यकारी विकास सोसायटी, हरी उद्धव धोत्रे विद्यालय, फुलगाव- गोलेगाव- पिंपळगाव प्रासादिक दिंडी, संत तुकाराम दिंडी, शनैश्वर देवस्थान ट्रस्ट, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच खुळे परिवाराचे वतीने त्यांचा ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती व पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला. याच बरोबर आदर्श सरपंच मंदानानी साकोरे, फुलगाव प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना कोविडयोद्धा, आशासेविका, महावितरण चे अधिकारी, गुणवंत शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी खेड पंचायत समिती सदस्या वैशाली जाधव, नंदा सुकाळे, वैशाली गव्हाणे, माजी सरपंच संतोष गव्हाणे, सरपंच मंदानानी साकोरे, माजी सरपंच सोमनाथ खुळे, कांताराम वागस्कर, नारायणराव खुळे, नामदेव वागस्कर, अशोक वागस्कर, सुनील वागस्कर, पोलीस पाटील योगिता साकोरे, माजी उपसरपंच भानुदास साकोरे, कांतीलाल साकोरे, पोपट खुळे, राहुल वागस्कर, राजेंद्र खुळे, दादाभाऊ खुळे, संध्या शिनगारे, उज्वला खुळे, निर्मला वागस्कर, सुशीला वागस्कर, नयना खुळे, शारदा वागस्कर, शनैश्वर मंदिराचे अध्यक्ष शामकांत कोळपकर, उपसरपंच योगेश कोळपकर, सोसायटीचे चेअरमन बबनराव साकोरे, माजी चेअरमन राजाराम साकोरे, सुदाम वागस्कर, बाबू वागस्कर, विठ्ठल खुळे, काळूराम खुळे, राजाराम शिवले, दिलीप वागस्कर, बाबाजी कदम, मारुती वागस्कर, उद्योजक किरण साकोरे, विलास खुळे, कपिल वागस्कर, नानेकरवाडी सरपंच गणेश जाधव, दावडी माजी सरपंच संतोष गव्हाणे, उद्योजक अमोल चौधरी, माजी सरपंच कुंडलिक चौधरी, प्रकाश चौधरी, चेअरमन मल्हारी चौधरी, संतोष चौधरी, पांडुरंग प्रासादिक दिंडीचे पदाधिकारी, आप्पासाहेब साकोरे, अंकुश खुळे, जयवंतराव खुळे, महादू खुळे, हरिभाऊ खुळे, माधव खुळे, नारायण खुळे, विकास खुळे, दीपक खुळे, ज्ञानेश्वर खुळे, संजय खुळे, भिमाजी खुळे, गुलाब खुळे, विजय खुळे, मारुती खुळे, आदेश खुळे, भानुदास खुळे, सत्यवान खुळे, योगेश खुळे, सागर खुळे, रोहिदास साकोरे, जयसिंग खुळे, अक्षय शिवले, किसन खुळे, आदिनाथ साकोरे, अविनाश साकोरे, राजेंद्र साकोरे, अशोक साकोरे, संतोष साकोरे, दीपक साकोरे, अशोक वंजारे, चंद्रकांत साकोरे, सोमनाथ गवारे, रवींद्र कोळपकर, शांताराम शिवले, संभाजी वागस्कर, सागर गवारे, अमित खुळे, सागर खुळे, गुलाब वागस्कर, बाळासाहेब साकोरे, नवनाथ वागस्कर, भानुदास वागस्कर, मिनीनाथ कंद, मुख्याध्यापक शरद वाखारे, सतीश केकान, नाना हेळकर, उपकेंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी माहेश्वरी नागरे तसेच फुलगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वामन खुळे, कपिल वागस्कर यांनी तर आभार राहुल वागस्कर यांनी मानले.



