-->
क्राईमराज्य

एका महिलेकडून तीस हजार रुपये किमतीचा १ किलो ५०० ग्राम गांजा जप्त

 

 

हवेली प्रतिनिधी / कालिदास गावडे

 

हवेली तालुक्यातील थेऊर येथे अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पुणे शहर पोलीस पथकाने एका महिलेस ३० हजार रुपये किमतीचा १ किलो ५०० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ अनाधिकाराने व बेकायदेशिररित्या जवळ बाळगताना मिळुन आल्याने तिला पोलिसांनी अटक केली आहे.

 

याप्रकरणी आशा बापु सोनावणे ( वय ४०, रा. सखाराम नगर, थेऊर ) हिस अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, पुणे शहरचे पोलीस निरीक्षक खांडेकर, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, पोलीस हवालदार बोमादंडी, शेळके, साळुके, खेवलकर, बास्टेवाड, महेश साळुके हे अंमली पदार्थ गैरव्यवहाराचे अनुषंगाने पेट्रोलींग करत थेऊर येथील सखाराम नगर मध्ये आले.

 

तिथे दुपारी ०३:०० ते ०४:०० वाजण्याच्या सुमारास आशा सोनावणे ही महिला उजव्या हातामध्ये एक पांढ-या रंगाची नायलॉन पिशवी घेवून उभी असलेली दिसली. त्यावेळी पथकाने थोडे आड बाजुला थांबुन तिचे हालचाली कडे लक्ष ठेवले असता तिच्या हालचाली संशयास्पद दिसुन आल्या. या वेळी त्या महिलेची व पथकाची नजरा – नजर होताच ती तेथुन घाई घाईने निघुन जाण्याचा प्रयत्न करु लागली. त्यामुळे तिच्या ताब्यातील पिशवी मध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचा संशय आला. ती निघुन जावु नये म्हणुन, तिला महिला पोलीस खेवलकर यांनी जागीच पकडले. तिचे जवळील पिशवी न उघडता पोलीस स्टाफने हाताने दाबुन पाहिले असता, त्यामध्ये झाडपाल्यासारखा कोणता तरी पदार्थ असल्याचे जाणवले. त्यानंतर वास घेवुन पाहता, तो गांजा सारखा उग्र स्वरुपाचा आला. त्यामुळे पिशवी उघडून पाहिली असता त्यामध्ये ३० हजार रुपये किमतीचा १ किलो ५०० ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला. गांजा जप्त करण्यात आला असून सदर महिलेस लोणी काळभोर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयाने तिला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी हे करत आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close