-->
आरोग्यकरमाळासामाजिक

राजुरीची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने; मेगा लसीकरण शिबिरात उच्चांकी लसीकरण

 

प्रतिनिधि/संजय साखरे

करमाळा तालुक्यातील राजुरी येथे एकाच आठवड्यातील दुसरे मेगा कोरोना लसीकरण शिबिर पार पाडले असून यामध्ये राजुरीतील ४१८ नागरीकांना कोवीशिल्ड या लसीचे पहिल्या व दुसऱ्या डोस चे लसीकरण करण्यात आले. यामध्ये वय वर्षे १८ ते ४४ असलेल्या २८१ नागरीकांना पहिला डोस, वय वर्षे ४५ ते ५९ असलेल्या ७० नागरीकांना पहिला डोस व २ जणांना दुसरा डोस तर, वय वर्षे ६० पेक्षा अधिक असलेल्या ५० नागरीकांना पहिला डोस व १५ नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. असे एकूण ४१८ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

राजुरी येथे आत्तापर्यंत झालेल्या लसीकरण शिबिराच्या माध्यमातून जवळपास १२०० नागरिकांचे लसीकरण झाले असून आजच्या लसीकरण शिबिरात युवक वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. आजच्या लसीकरणा मध्ये १५० रॅपिड टेस्ट करण्यात आल्या असून सर्वच्या सर्व टेस्ट निगेटिव आल्या आहेत.

सदर लसीकरण शिबिर पार पाडण्यासाठी कोर्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर शिंदे, सौ. टेकाळे व माळी सिस्टर, आरोग्यसेवक कापसे, राजुरीच्या पोलीस पाटील वैशाली चिंचकर, ग्रामसेवक गलांडे भाऊसाहेब, तलाठी चव्हाण भाऊसाहेब, सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत साखरे, प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री. सुरवसे सर व जाधव सर माध्यमिकचे श्री. तळेकर सर व साखरे सर, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close