-->
करमाळासामाजिक

माणुसकीच्या हातांचा यशकल्याणी परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक गौरव सोहळा संपन्न…

 

करमाळा प्रतिनिधी/प्रविण अवचर

यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गणेशभाऊ करे-पाटील यांच्या विचारांनी कोरोना काळात सेवा केलेल्या कोरोना योध्यांचा व प्रामाणिकपणा जपलेल्या माणुसकीच्या हातांचा यशकल्याणी परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक गौरव सोहळा यश कल्याणी सेवाभवन येथे संपन्न झाला.

कोविड योद्धा म्हणून बौद्धाचार्य प्रशांत लिंबराज कांबळे, बौद्धाचार्य सावताहरी कचरू कांबळे आणि सामाजिक कार्यकर्ते अरूण कांबळे यांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रामाणिकपणाबद्दल गणराज ड्रायक्लिनचे संचालक रावसाहेब सावरे यांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या करमाळा शाखेस यशकल्याणी परिवाराकडून पंचवीस हजार रूपयांची देणगी धनादेशाद्वारे पुढील सेवा कार्यास मदत म्हणून प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नागेशदादा कांबळे यांनी सर्व कोरोना योद्ध्यांचे अभिनंदन करून त्याच्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा तहसील कार्यालयाचे मंडल अधिकारी संतोषजी गोसावी साहेब यांनी यशकल्याणीच्या परिवाराच्या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करून पुढील काळात माणसांनी माणुसकी जपण्याचे आवाहन केले.

पुणे सुरक्षा विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी साहेब यांनी यशकल्याणी परिवाराचा पाया हा शिव – शाहु – फुले आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांनी घातला गेल्याचे नमुद करून भविष्यात सुद्धा जिथे उणीव तेथे जाणिव ठेवून आम्ही करमाळकरांची सेवा करू असे मत व्यक्त केले. यावेळेस जेष्ठ नेते लक्ष्मणराव भोसले साहेब, नगरसेवक राजू आवाड साहेब, प्रा. भिमराव कांबळे, दत्ता बडेकर, बाळासाहेब कांबळे, शाहिर नंदू कांबळे, प्रसन्नजीत कांबळे यांची अभिनंदनपर भाषणे झाली. या कार्यक्रमासाठी रोहा, जि.रायगड येथील प्रा. पांडुरंग लोखंडे, गोटू कांबळे, भाऊनाना कांबळे, सिद्धार्थ भोसले, रणजित कांबळे, एल. यु. कांबळे, शाहिर बनशी दादा कांबळे, नामदेव वाघमारे उपस्थित होते.

त्यागमुर्ती माता रमाई बुद्ध विहार व भारतीय बौद्ध महासभा शाखा करमाळा तालुका व शहर जि. सोलापूर येथील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सिध्दार्थ नगर करमाळा येथील सर्व लहान मुले, मुली, महिला उपस्थित होते. शेवटी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने गणेशजी करे-पाटील साहेब यांचा वाढदिवस बोधीवृक्ष, शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल दामोदरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. संदिपान धाकतोडे यांनी केले .

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close