-->
आरोग्यकरमाळा

जेऊर रुग्णालयाचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री मनोज पदमाळे यांचा निरोप समारंभ सम्पन्न

 

 

जेऊर प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

करमाळा तालुक्यातील जेऊर ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेले प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री मनोज पद्माळे यांची प्रशासकीय बदली जेऊर येथून वरकुटे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली आहे. त्याबद्दल जेऊर ग्रामस्थांच्यावतीने त्यांच्या आजपर्यंतच्या कामाची दखल घेऊन त्यांना निरोप देण्यात आला.

 

त्यांनी आपल्या सेवेच्या काळात जेऊर व परिसरातील रुग्णांना विनम्र व आस्थेवाईकपणे सेवा दिली. त्यामुळे त्यांचा विशेष सन्मान करून निरोप देण्यात आला. यावेळी माजी पंचायत समिती सदस्य विलास दादा पाटील, जेऊर ग्रामपंचायत सदस्य उमेश पाथ्रूडकर, सामाजिक कार्यकर्ते नितीन खटके, बालाजी गावडे, आजीनाथ माने, शिवम कोठावळे, अमित संचेती, अजय उपाध्ये, रणजित कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close