-->
आरोग्यकरमाळासामाजिक

पीपल्स डेव्हलपमेंट फाऊंडेशन चा स्तुत्य उपक्रम; मोफत डोळे तपासणी शिबिरात ११० लोकांना लाभ

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील केम येथे सोमवार दिनांक ०६ /०९/२०२१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा केम या ठिकाणी पीपल्स डेव्हलपमेंट मार्फत मोफत डोळे तपासणी शिबिर उस्फुर्त प्रतिसादात संपन्न झाले.

पीपल्स डेव्हलपमेंट फाऊंडेशन ( महाराष्ट्र राज्य ) व गयाबाई बहुउद्देशीय समाज सेवा संस्था करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने व बुधराणी हॉस्पिटल कोरेगाव पार्क पुणे यांच्या सहकार्याने अल्पदरात मोतीबिंदू, भिंग रोपण शस्त्रक्रिया व डोळे तपासणी व अल्प दरात चष्मे वाटप शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

यावेळी केम गावचे सरपंच आकाश भोसले, अजित तळेकर, सागर दोंड, गोरख पारखे, बापू तळेकर, महेश्वर कांबळे, महेश तळेकर सर, अच्युत काका पाटील, शिवसेना महिला तालुका प्रमुख वर्षाताई चव्हाण, मोरे मॅडम व ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांचे पीपल्स डेव्हलपमेंट फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव उर्फ दीपक काकडे, गयाबाई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष किसन कांबळे सर, संजय कुमार घोरपडे सर यांच्या हातून गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

या शिबिरास जिल्हा परिषद अध्यक्ष माननीय श्री अनिरुद्ध अण्णा कांबळे यांनी भेट देऊन पीपल्स डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री. ज्ञानदेव उर्फ दीपक काकडे, संचालक भैरनाथ उघडे, संचालक राहुल रामदासी तसेच गयाबाई बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक किसन कांबळे, संजय कुमार राजेघोरपडे सर यांचे स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या शिबिराचा केम गावातील ११० लोकांनी लाभ घेतला. शिबीर संपन्न करण्यासाठी पीपल्स डेव्हलपमेंट फाउंडेशन व गयाबाई बहुउद्देशीय समाज सेवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close