-->
करमाळासामाजिक

आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक यांची २३० वी जयंती खंडुशेठ गावडे युथ फाउंडेशनच्या वतीने स्वच्छता अभियानाने साजरी

 

हवेली प्रतिनिधी/कालिदास गावडे

हवेली : आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २३० वी जयंती राज्यभर मोठया उत्साहात साजरी होत असते. या वर्षी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम कमीत लोकांमध्येच करण्याचे बंधन आहे.

जयंती साजरी करताना वायफळ होणारा खर्च टाळुन विधायक उपक्रम राबवावेत अशी भुमिका नेहमी खंडुशेठ गावडे युथ फाउंडेशनची राहीलेली आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणुन आज थेऊरगांवामधील साखर कारखाना काॅलनी मध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियाना अंतर्गत काॅलनीमध्ये वहीवाट व वावर नसल्यामुळे वाढलेली झाडे, गवत, कचरा जेसीबी मार्फत व कार्यकर्त्यांनी हाताने स्वच्छ केला. कारखाना बंद झाल्यामुळे ही कॉलनी दुर्लक्षीत झालेली आहे. पण आज या उपक्रमाद्वारे काॅलनीतील रहीवाशांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच खंडुशेठ गावडे युथ फाउंडेशनच्या वतीने काॅलनीसाठी कायमस्वरुपी पाणीपुरवठा व त्यासाठी लागणारी वीज पुरवण्यात येणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात खंडुशेठ गावडे जनसंपर्क कार्यालय थेऊर येथे राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला अभिवादन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.

या प्रसंगी थेऊर बीटचे पोलीस हवालदार विजय जाधव, मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष खंडुशेठ गावडे, रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया तालुकाध्यक्ष मारुती दादा कांबळे, दलित महासंघ अध्यक्ष आनंद वैराट, योगेश गावडे, सचिन राऊत, दत्तात्रय गावडे, आत्याराम खेंडकर, देवा गावडे, राहुल गायकवाड, दादा गुरव, गणेश गावडे, महेश गावडे, दत्तात्रय चव्हाण, दादा घुमे, संजय धनवडे,सागर बोडरे, सचिन गावडे, संजय मुळेकर, रोहीत चव्हाण, धम्मकिरण कांबळे, आकाश आटोळे, बाबा वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close