-->
करमाळासामाजिक

श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट चा आरंभ प्रतिष्ठानकडून ‘राष्ट्रीय सुवर्ण सामाजिक संस्था’ या पुरस्काराने सन्मान

माय मराठी न्युज नेटवर्क

श्री. शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट हे नाव ऐकल की, मनामध्ये विचार येतो तो रक्तदान मोहिमेचा. मागील तीन वर्षांपासून रक्तदान क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करून रक्तदानासाठी युवकांची चळवळ उभी करण्याच्या माध्यमातून शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट हे महाराष्ट्र भर कार्य करत आहे. हि संकल्पना यशस्वी होत असून, महाराष्ट्रामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन व गरजू, गरीब तसेच ट्रस्ट च्या माध्यमातून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्याला गरज पडल्यास मोफत रक्तपिशवी मिळवून देण्यासाठी शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे नाव अग्रस्थानी आहे.

हे सर्व पदाधिकारी आणि युवकांच्या पाठिंब्यामुळे शक्य होत असल्याचे संस्थेकडून वेळोवेळी सांगण्यात येते. अनेक संस्था, प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आजपर्यंत शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीच्या या समाजोपयोगी कामाची दखल घेऊन अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आज आरंभ प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही श्री. शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या रक्तदान क्षेत्रातील या कामाची दखल घेऊन ट्रस्टला राष्ट्रीय सुवर्ण समाजसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा सन्मान देऊन ट्रस्ट ला गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यनगरीचे माजी उपमहापौर मा. श्री. कैलास बांबूर्डे, आरंभ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी टाक, उपाध्यक्षा सारिका नागरे यांच्या हस्ते हा पुरस्कार आळंदी देवाची येथे देण्यात आला. यावेळी शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीकडून संस्थापक अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे, बारामती तालुका कार्याध्यक्ष माउली खाडे, पुणे शहर कार्याध्यक्ष राहुल भोसले, करमाळा तालुका उपाध्यक्ष अंगद भांडवलकर व ऋषिकेश चव्हाण उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close