“भारतीय शेतीचे सूत्र, देशी गाईचे शेण गोमूत्र” गोरक्षक परमेश्वर तळेकर यांचा बैलपोळानिमित्त महत्त्वपूर्ण संदेश
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील गोरक्षक परमेश्वर तळेकर यांच्या गोमाता मंदिरात पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या गोमाता मंदिरात एकूण लहान मोठे ३१ देशी पशुधन आहे. अलिकडील काळात देशी गाईंची संख्या अतिशय कमी झाली असल्याचे दिसत आहे. परंतु, केम येथील परमेश्वर तळेकर या गोरक्षक शेतकऱ्यांने हे पशुधन जतन केले आहे. दर वर्षी पोळ्याला या देशी पशुधन ची मिरवणूक मोठ्या थाटामाटात गावातून काढली जाते. परंतु, गेल्या वर्षभरापासून कोरोना मुळे मंदिरातच पोळा हा सण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे. सर्जा राजांचे लग्न लावण्यासाठी मंगल असष्टिका म्हणली जाते. त्यानंतर आलेल्या वऱ्हाड मंडळींसाठी गोड जेवण दिले जाते.
या पोळ्याच्या सणाविषयी परमेश्वर तळेकर म्हणाले की, “भारतीय शेतीचे सूत्र, देशी गाईचे शेण, गोमूत्र” “गाय वाचवा, देश वाचवा” पशुधन वाचले तरच शेती आणि मानवाचे आरोग्य टिकणार आहे. शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणजे पोळा हा सण आहे. भविष्यात शेती व मानवाचे आरोग्य टिकवायचे असेल तर पशुधन संभाळणे हि काळाची गरज आहे. आपण पोळ्याच्या सणाला संकल्प करू या प्रत्येकानी एक तरी देशी पशुधन पाळायचे आहे. माझे कुटुंब या पशुधन वर चालते. माझ्या साडे तीन एकर क्षेत्रांमध्ये गाईसाठी चारा पिके घेतली जातात व यातुन पशुधनांना अन्न सहज मिळते. माझे कुटूंब हे दहा माणसाचे कुटुंब असून या पासुधनांपासून मिळणाऱ्या उत्पन्नातून आम्ही सुखासमाधानाने व सुटसुटीत जीवन जगत आहे.




