करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील वडगाव उत्तर येथे आज दिनांक ०६/०९/२०२१ रोजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून व सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल तसेच पंचायत समिती सदस्य अँड. राहुल सावंत यांच्या सहकार्यातून कोरोणा लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या लसीकरण शिबिरकरिता प्रथम १५० नागरीकांना डोस देऊन लसीकरण करण्याचे नियोजन होते. परंतु वडगाव उत्तर येथील नागरिकांचा लसिकरणासाठी असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आणखी ८१ लसीचे डोस मागवण्यात आले. या लसीकरण शिबिरामध्ये १८ वर्षापुढील २१० नागरिकांना पहिला डोस तर २१ नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला. यावेळी एकूण २३१ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन समिती, सर्व ग्राम पंचायत सदस्य व ग्रामसेवक अधिकारी तसेच वडगाव ग्रामस्थांनीही सदर शिबिर उत्साहात पार पाडण्यासाठी सहकार्य केले. वडगाव उत्तर येथील सर्व ग्रामस्थांनी आजच्या लसीकरण शिबिरासाठी भरपूर प्रतिसाद दिला. तसेच काहीही गडबड गोंधळ न करता आजचे लसीकरण शिबिर व्यवस्थित पार पाडून सहकार्य केले. तसेच यापुढे गरज पाहता असाच लसीकरण शिबिराचे आयोजन करण्याचा प्रयत्न राहील. अशी माहिती सरपंच प्रतिनिधी बालाजी अंधारे यांनी यावेळी दिली.
या लसीकरण शिबिरासाठी वडगाव उत्तर येथील जिल्हा परिषद शाळेच्या सर्व शिक्षकांनी लसीकरणा साठी मोबाइलद्वारे नाव नोंदणी केली. शिक्षकांनी केलेल्या या सहकार्यामुळे नागरिकांनी त्यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
या लसीकरण शिबिरासाठी साडे PHC सेंटर अंतर्गत येणाऱ्या सर्व आरोग्य विभाग, सर्व आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आशाताई व डॉक्टर यांनी या कामी महत्वाची भूमिका पार पाडली आहे. विशेष करून डॉक्टर देवकर साहेब व डॉक्टर शहा साहेब यांनी जादा लसीचे योग्य नियोजन करून जास्तीत जास्त नागरीकांना डोस देण्याचा प्रयत्न केला.




