हवेली प्रतिनिधी/कालिदास गावडे


हवेली तालुक्यातील केसनंद मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याकडून भव्य वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. शिरूर हवेली विधानसभेचे लोकप्रिय आमदार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अभ्यासू नेते ॲड. अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्व हवेली तालुक्यातून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हवेली तालुका उपाध्यक्ष श्रीकांत दादा पाटोळे यांच्या मार्गदर्शना नुसार केसनंद येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या जोगेश्वरी विद्यालय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आमदार अशोक पवार यांनी व्हिडीओ कॉल द्वारे कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा किंवा हार, नारळ, बुके न आणता आपल्या गावात भव्य वृक्षारोपणाचे कार्यक्रमाचे आयोजन करावे. यामुळे पुढील काळात ऑक्सिजन भरपूर मिळेल. नुसते वृक्षारोपण करू नका तर लावलेल्या वृक्षाचे व्यवस्थित संगोपन करून वृक्षवल्ली कशी वाढेल याकडे लक्ष द्या. ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’ असा अनमोल संदेश यावेळी अशोक पवार यांनी दिला.
तर अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये जास्तीत जास्त समाजोपयोगी कामे करून बापूंचा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा करू असे आश्वासन हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर यांनी दिले.
यावेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, मा. सरपंच चंद्रकांत सातव, सरचिटणीस बाळासाहेब हरगुडे, महिला आघाडीच्या हवेली तालुका अध्यक्ष शोभा हरगुडे, सुरेखा भोरडे, सीता जाधव, राहुल शिंदे, लीलाबाई हरगुडे, पांडुरंग हरगुडे, भिमराव शिंदे, कांचन व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



