-->
करमाळा

करमाळा एम.आय.डी.सी. लवकरच कार्यान्वित करणार; आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

 

 

करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

करमाळा-मांगी रस्त्यावरील १९९७ साली प्रस्तावित झालेल्या एम.आय.डी.सी. चे काम वर्षानुवर्षे रेंगाळलेले होते. नगर – टेंभुर्णी या महामार्गावरील करमाळा शहर ते मांगी दरम्यान शासनाने ५० हेक्‍टर क्षेत्र एम.आय.डी.सी. साठी संपादित केलेले असून सध्या त्या ठिकाणी फक्त शासकीय आय.टी.आय ची इमारत व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे एक उपकेंद्र सुरु आहे. पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे या ठिकाणी इतर व्यावसायिक आपले कोणतेही उद्योगधंदे सुरू करू शकले नाहीत. उद्योगधंद्यासाठी आवश्यक असलेली सेवा सुविधा उपलब्ध नसल्यामुळे सदर काम रेंगाळलेले होते. परंतु, आता या कामांचा प्रारंभ केलेला असून एम.आय.डी.सी. लवकरच कार्यान्वित करू असा विश्वास आमदर संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

 

एम.आय.डी.सी. च्या शेजारून जाणारा महामार्ग तसेच केंद्रशासनाच्या प्रस्तावित असलेल्या दक्षिण भारत ते उत्तर भारत या नियोजित रस्त्यांची अडचण आता सुटलेली असून बांधकाम विभागाकडून व पर्यावरण मंत्रालयाकडून तसे पत्र मिळाल्यामुळे एम.आय.डी.सी. मध्ये सध्या वेगाने कामे सुरू आहेत. रस्ते, वीज, पाणी यांची पूर्तता लवकरच करून बाहेरील उद्योगधंद्यांसाठी आवश्यक असलेले वातावरण आपण या ठिकाणी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही यावेळी बोलताना आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले.

 

सध्या रस्त्यांची कामे एम.आय.डी.सी. मध्ये सुरु असून उर्वरित कामे ही लवकरच पूर्ण होतील आणि त्यानंतर एम.आय.डी.सी. कार्यान्वित होईल. यादरम्यान शासन निर्देशानुसार प्लॉटचे वितरण केले जाणार आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close