-->
करमाळाराजकिय

भारतीय जनता पार्टी मागासवर्गीय सेलच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष पदी समाधान कांबळे यांची निवड

 

करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील भाजपाचे युवा कार्यकर्ते श्री. समाधान कांबळे यांची भारतीय जनता पार्टी मागासवर्गीय सेलच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी व वाशिंबे येथील श्री. अमोल पवार यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस पदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल उंदरगाव, मांजरगाव, वाशिंबे, राजुरी, पारेवाडी तसेच परिसरातील ग्रामस्थ व मित्र परिवाराकडून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ वाशिंबे चौफुला येथे करण्यात आला.

सदर सत्कार समारंभावेळी बोलताना नूतन पदाधिकारी श्री. समाधान कांबळे म्हणाले की, केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असून केंद्र सरकारच्या मागासवर्गीय घटकांसाठी अनेक योजना आहेत. राज्यातही भाजपा एक सक्षम विरोधी पक्ष आहे. माझ्यावर पक्षाने सोपवलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडून पक्षवाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील मागासवर्गीय समाजातील तरुणांना संघटित करून समाजाला जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ करून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.

 

यावेळी संतोषजी वाळुंजकर, दशरथ चव्हाण पाटील, अशोक जाधव, केरबा मोरे, संजय महाराज निकत, सचिन दादा निकत, तुकाराम कांबळे, महादेव घाडगे, नाना गोडगे, विठ्ठल कांबळे, बाळू कांबळे, तुषार वाळुंजकर, मारुती निकत, गोकुळ आनारसे, राजेश घाडगे, दादा निकत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close