-->
करमाळा

वाहतूक पोलिसांचा तालीबानी कारभार; चक्क, वाहन चालकासह उचलली गाडी

माय मराठी न्युज

वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांकडून अनेक ठिकाणी नो पार्किंग झोन तयार करण्यात आले आहेत. या नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी केली असल्यास वाहतूक पोलिस त्या वाहन मालकांकडून दंड वसूल करत असतात. मात्र पुण्यात एक वेगळाच प्रकार समोर आला आहे. नो पार्किंग मध्ये दुचाकी वाहन उभे असतांना वाहतूक पोलिसांनी चालकासह वाहन टोईंग व्हॅनमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार उपस्थित नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केला आहे. ही घटना गुरुवारी घडली आहे

प्रकरण असे आहे की, पुण्याच्या नानापेठ परिसरात एका दुचाकीस्वराची गाडी नो पार्किंग झोनमध्ये उभी होती. नो पार्किंग झोन वाहतूक विभागाकडून तयार केले जातात. जेणे करून वाहने चुकीच्या जागी लावल्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये. आणि या नो पार्किंग झोन मध्ये कोणी गाडी उभी केली, तर त्यांच्या कडून दंड वसूल करण्यात येतो. किंवा वाहन टोईंग व्हॅन मधून उचलण्यात येते. पुण्यात मात्र वाहुतक पोलिसांनी चक्क वाहनासह वाहन मालकाला देखील उचलण्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

  • सध्या दुचाकीस्वारांना अडवून त्यांचे काहीही ऐकून न घेता त्यांच्याकडून दंड वसूल करण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यावर स्पष्टीकरण देत असताना वाहतूक पोलिसांनी सांगितले की, या दुचाकीस्वाराची गाडी नो पार्किंग झोन मध्ये लावलेली होती, म्हणून कारवाई करण्यात आली आहे. परंतु पुणे वाहतूक पोलिसांनी वाहनासकट चालकाला उचलून टोईंग व्हॅन मध्ये गाडी ठेवण्याच्या अशा पद्धतीने कारवाई करणे कितपत योग्य आहे. जर दुचाकीस्वार गाडीवरून पडला असता आणि डोक्याला मार लागला असता किंवा काही दुखापत झाली असती तर त्याला जबाबदार कोण असणार ? असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close