-->
करमाळासामाजिक

भाजपा करमाळा व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या वतीने जागतिक योग दिवस उत्साहात साजरा

 

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून २१ जून हा दिवस जगभरामध्ये जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने भाजपा करमाळा तालुका व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्यावतीने करमाळा येथे शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून भारतीय प्राचिन शास्त्र असलेल्या योगाची माहिती संपूर्ण जगाला पटवून दिली. संपूर्ण जगाने योगाभ्यास करून याचे महत्त्व समजून घेतले आणि २१ जून हा दिवस जागतिक योग दिन घोषित करण्यात आला. योगाचे महत्त्व समजून घेऊन प्रत्येकाने दैनंदिन जीवनामध्ये योगासने व व्यायाम केला पाहिजे. आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी आज सर्वात जास्त योगासने, प्राणायाम आणि व्यायमाचीच खरी गरज आहे.

यावेळी योग प्रशिक्षक श्री साहेबराव आरकिले सर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री अभय शहाणे सर यांचे मार्गदर्शन लाभले. करमाळा भाजपा महिला आघाडीच्या वतीने ही योगदिन कार्यक्रम महिलांसाठी स्वतंत्र घेण्यात आला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, माजी शहराध्यक्ष चंद्रकांत राखुंडे, माजी शहरउपाध्यक्ष मच्छिंद्र फंड, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हा चिटणीस अश्विनी भालेराव, कल्पना भालेराव, पद्मजा भालेराव, पूजा रामनवमीवाले, अस्मिता जवकर, राधा येवले, राजश्री गवळी, वैष्णवी काळे, प्रसिद्धीप्रमुख जंयत काळे पाटील, प्रमोद फंड, गिरीष वाशिंबेकर, अक्षय कुंभार, मनोज मुसळे, संताजी घोरपडे, शिवाजी कुंभार, लक्ष्मण काळे, प्रसाद कोकीळ, विनोद इंदलकर, महादेव गोसावी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close