-->
महिलाविषयकराज्य

पतीला प्रेयसी सोबत रंगेहाथ पकडले; राग अनावर झाल्याने प्रेयसीला धो धो धुतले!

 

माय मराठी न्युज नेटवर्क

प्रेयसीसोबत मजामस्ती करणाऱ्या एका पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले आणि त्यानंतर दोघांनाही चांगलीच अद्दल घडवली आहे. आपल्या पतीसोबत प्रेयसीला पाहून पत्नी चांगलीच संतापली आणि मग तिने धावत जात प्रेयसीला आपल्याच स्टाईलमध्ये धडा शिकवत धू धू धुतले. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

 

आपल्या पतीच्या वागण्या, बोलण्यावर संशय असल्याने पत्नीने पतीवर पाळत आणि पत्नीचा संशय खरा ठरला. तिने आपल्या पतीचा पाठलाग करून पतीला त्याच्या मैत्रिणीसह रंगेहात पकडले. औरंगाबाद मधल्या सिडको परिसरातील गणपती मंदिर परिसरातला हा व्हिडिओ आहे. तिथल्या एका महिलेला आपल्या पतीच्या वागण्या बोलण्यावर संशय आला होता म्हणून गेल्या अनेक दिवसापासून ती आपल्या पतीवर पाळत ठेवून होती. काल पतीवर पाळत ठेवत असताना तिने त्याचा पाठलाग केला. त्यावेळी आपला पती एका मुलीसोबत हॉटेलमध्ये निघाला आहे हे पाहून तिचा संशय बळावला. त्या दोघांना एकत्र पाहून तिचा राग अनावर झाला आणि धावत जाऊन पतीच्या मैत्रिणीला धू धू धुतले आणि तिला शिव्या ही घातल्या. या सगळ्या प्रकाराचा तिने पती आणि त्याच्या मैत्रिणीकडे जाब विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु ते दोघेही निरुत्तर झाले होते.

 

यावेळी या तीघा जणांमध्ये बराच वेळ झटापट झाली. काही वेळानंतर तिथल्या नागरिकांनी हस्तक्षेप करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेच्या आक्रमकपणा मुळे तिच्या पतीची आणि तिच्या मैत्रिणीची चांगलीच धांदल उडाली होती.

 

हा व्हिडीओ कधीचा आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, आपल्या पतीला त्याच्या प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडुन पत्नीने त्यांना चांगलाच धडा शिकवला. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कुणीतरी शूट केली असून सध्या तो व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close