-->
करमाळासामाजिक

वाशिंबे येथे गणेश झोळ यांच्या सहकार्याने जनावरांना मोफत लसीकरण

 

 

प्रतिनिधी/वाशिंबे

 

करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथे जनावरांच्या लंपी या साथीच्या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी वाशिंबे ग्रामपंचायत सदस्य गणेश भाऊ झोळ यांनी स्वखर्चाने मोफत लसीकरणाचा आज शुभारंभ करण्यात आला.

 

वाशिंबे गावातील सर्व जनावरांच्या लसीकरणासाठी जेवढ्या लसी लागतील तेवढ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या आहेत. शेतकर्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश झोळ यांच्याशी संपर्क करावा. असे आवाहन गणेश भाऊ झोळ यांनी केले आहे. 

 

वाशिंबे पशुवैद्यकीय दवाखाना पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश झोळ व त्यांच्या टीमच्या सहाय्याने गावातील शेतकर्यांच्या गोठ्यावर जाऊन लसीकरण करण्यात येईल. कदाचित वाशिंबे गावं हे करमाळा तालुक्यातील १०० टक्के लसीकरण झालेले पहीलेच गावं असेल.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close