-->
क्राईममहिलाविषयकराज्य

आईच्या मारहाणीत चिमुकलीचा मृत्यू; निर्दयी आईला अटक

 

माय मराठी न्युज नेटवर्क

मुंबईतील विरारमध्ये एका जन्मदात्या आईनेच स्वतःच्या दोन वर्षांच्या मुलीला मारहाण करत तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी आरोपी आई विरुद्ध हत्येचा गुन्हा नोंद केला असून सदर आरोपीला अटक केली आहे. विरार पूर्वेच्या फुलपाडा येथील पारिजात अपार्टमेंट या इमारतीमध्ये गेल्या सहा महिन्यापासून रिक्षाचालक सोनुकूमार सोनी हा पत्नी नेहा आणि मुलगी नानसी सोबत राहत होता. या मुलीची आई सतत मुलीला बेदम मारहाण करत होती. शनिवारीही तिने केलेल्या अशाच मारहाणीत नानसी या दोन वर्षांच्या चिमुकली चा मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शनिवारी दुपारी नेहाने संतापाच्या भरात आपल्या दोन वर्षाच्या मुलीला बेदम मारहाण केली. डोक्याला जबर मार लागल्याने चिमुकली मुलगी बेशुद्ध झाली होती. त्यानंतर तिने आपल्या पतीला फोन करून ही माहिती दिली असता पतीने तातडीने मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचाराआधी च या चिमुकलीला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सुरुवातीला पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, सोमवारी मुलीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागावर जबर मारहाण केल्याचे उघड झाले. त्यावरून पोलिसांनी तपास करून सदर मुलीच्या निर्दयी आईवर हत्या केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्या मुलीच्या आईचे नाव नेहा सोनू कुमार सोनी ( वय २२वर्षे ) असून हे तिला अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपी आई ही भांडखोर असून नेहमी घरात भांडण करायची. तसंच लहान मुलांना नेहमी बेदम मारहाण करत होती. मुलांचा मारताना कोणी शेजारी मध्यस्ती करून सोडवायला गेले तर ती त्यांनाच उलट सुलट बोलून तिथून हाकलून द्यायची. तिच्या या रागामुळे एका मुलीची हत्या झाली आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया शेजार्‍यानी दिली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close