-->
करमाळाक्राईम

करमाळा पोलिसांची कारवाई; सोन्याचे दागिने हिसकावणारा आरोपी जेरबंद

 

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा शहरात मोटारसायकलवरून येऊन महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावून पळून जाणाऱ्या आरोपीला करमाळा पोलिसांनी अटक करून महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. या कारवाईत चोरीस गेलेल्या १.७५ तोळे वजनाचे सोन्याचे मिनी गंठण त्यात दोन सोन्याच्या वाट्या त्याला सोन्याची तार व चार सोन्याचे मनी तसेच त्यास काळेमणी असलेली सोन्याची चैन असे एकूण २ लाख ५३ हजार ७५० रुपये किमतीच्या सोन्यापैकी १०.७८० मिली वजनाचे १ लाख ३५ हजार ८२८ रुपये किमतीचे अर्धवट सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्च २०२६ रोजी फिर्यादी मिना माणिक मैड या करमाळा येथील आपल्या मुलाकडे येऊन परत जात असताना करमाळा शहरातील महादेव मंदिराजवळ मोटारसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले होते. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदाराकडील माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान लखन उर्फ फिरोज अजिज शेख (रा. नेवासा फाटा, ता. नेवासा जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीतील अर्धवट सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून या आरोपीवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांत अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा, करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close