-->
Uncategorizedदेशराजकिय

बसपाचा भाजपाला पाठिंबा..? राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण..!

 

माय मराठी न्युज नेटवर्क

देशभरातील ओबीसीच्या स्वतंत्र जनगणनेची मागणी होत असताना या दरम्यान बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी ट्विट केले आहे की, ‘बसपा सुरुवातीपासून देशात ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करण्याची मागणी करत आहे आणि अजूनही बसपाची हीच मागणी आहे. या प्रकरणात केंद्र सरकारने सकारात्मकता दाखवत जर त्यांनी काही पावले उचलली तर बसपा संसदेच्या आत आणि बाहेर नक्कीच भाजपाला पाठिंबा देईल.’

देशातील ओबीसींची जातिनिहाय जनगणना हा विषय मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. या विषयावर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पटणा, नालंदा, गया आणि जहानाबाद या जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केल्यानंतर पटणा विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही ओबीसी जनगणनेच्या मुद्द्यावर सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पंतप्रधानांच्या भेटीची मागणी केलेली आहे. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रही लिहिले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी घेतलेल्या या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्षा मायावती यांनी हे विधान केलेले आहे. यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे. बिहारमधील दोन्ही पक्ष आणि विरोधक यांनी ओबीसींसाठी जातीच्या जनगणनेची जेव्हा मागणी केली आहे तेव्हाच मायावतींनी असे विधान केल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा होत आहेत. यापूर्वी नितीश कुमार यांनी राजद नेते तेजस्वी यादव यांच्या स्वतंत्र ओबीसी जनगणनेच्या मागणीला पाठिंबा दर्शवत ओबीसींची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे असे म्हटले होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close