-->
राजकियराज्य

आता संजय राऊतांचा ‘मॅटिनी शो’ बंद झाला; दिल्लीतून मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात

 

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेपाठोपाठ लोकसभेतही शिवसेनेला धक्का दिला आहे. शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी १२ खासदारांनी बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना पाठिंबा दिला आहे. या खासदारांसोबत एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत शक्तीप्रदर्शन केलं. १२ खासदारांना घेऊन शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बाळासाहेबांच्या विचारामुळे नाही तर ईडीच्या दबावामुळे भाजपसोबत जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. या आरोपांबाबत एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं.

 

 

संजय राऊत यांचा सकाळचा ‘मॅटिनी शो’ आता बंद झाला आहे, ते दखल घेण्यासारखे नाहीत. दूसरं कोणी असतं तर आम्ही दखल घेतली असती. संजय राऊतांच्या आरोपावर आम्हाला बोलण्याची गरज नाही, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. असं जे कोण म्हणतंय त्याबाबत आमचे गटनेते बोलतील. दबाव आहे की नाही ते सांगतील. पण जे रोज सकाळी बोलतात त्यांचा ‘मॅटिनी शो’ मात्र बंद झाला आहे. त्यांचा मॅटर कोर्टात चालू आहे आणि कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय घेतला आहे. सरकारने त्यांना कोणतीही क्लिन चीट दिली नाही. तुमची माहिती सुधारून घ्या, असे शिंदे म्हणाले.

 

 

आजच्या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते राहुल शेवाळे, मुख्य प्रतोद भावना गवळी, कृपाल तुमाने, सदाशिव लोखंडे, हेमंत गोडसे, प्रतापराव जाधव, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, हेमंत पाटील, अप्पा बारणे, राजेंद्र गावीत, श्रीकांत शिंदे हे सर्व बारा खासदार उपस्थित होते. शिवसेना लोकसभा गट तयार करून १२ लोकांचं पत्रं दिलं आहे. जे खासदार २२ लाख मतदारांतून निवडून येतात. इतक्या मतांनी खासदार झालेल्या लोकप्रतिनिधिंनी ही बाळासाहेबांच्या विचाराचे स्वागत केले आहे. आता राज्यात जे काही चांगले करता येईल ते करू, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.© maharashtra update

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close