-->
आरोग्यकरमाळा

आ.संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जेऊर येथे ५०० नागरिकांचे लसीकरण शिबिर संपन्न

करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

करमाळा तालुक्यातील जेऊर येथे आज आ. संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देत जेऊर ग्रामपंचायत सदस्य उमेश पाथ्रूडकर, सामाजिक कार्यकर्ते बालाजी गावडे, नितीन खटके पाटील यांच्या प्रयत्नातून कोरोना लसीकरणाचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातील लसीकरणाचा लाभ ५०० नागरिकांनी घेतला.

यावेळी पंचायत समिती सदस्य विलास दादा पाटील , आनंद पतसंस्था चेअरमन अभयराज लुंकड, कार्यकारी संचालक डांगे साहेब , ग्रामपंचायत सदस्य देवानंद पाटील, निकील मोरे, शहाजी कोंडलकर, मेजर आनंद पवार हे मान्यवर उपस्थित होते.

सध्याच्या परिस्थितीत युवकांना पोलीस भरती व सैनिक भरतीसाठी आवश्यक करण्यात आलेल्या लसीकरणाच्या नियमामुळे अनेक तरुणांना या लसीकरणाचा लाभ झाला. तसेच व्यापारी पेठेतील व्यापारी व कामगार यांना या शिबिराचा फायदा झाला . त्याबद्दल सर्वसामान्य जनतेने आमदार संजय मामा शिंदे यांचे धन्यवाद मानून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

या शिबिरासाठी उपजिल्हा रुग्णालय जेऊर चे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .या शिबिरासाठी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अजिनाथ माने, समीर केसकर, धनंजय गारुडी, सागर लोंढे, शिवम कोठावळे, बाबू शिंदे, अतुल निर्मळ, रणजित कांबळे, लतेश घनवट आदी युवकांनी परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close