-->
राजकियराज्य

शिरूर तालुका वाहतूक सेनेच्या प्रमुख पदी गोविंद ढेरंगे

गोविंद ढेरंगे यांना शिवसेना वाहतूक शाखा शिरूर तालुका नियुक्ती पत्र देताना मान्यवर

 

कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

तळागाळातील लोकांसाठी मोठ्या प्रमाणात व्यापक काम करणार असून, शिरूर तालुक्यातील सर्व वाहन चालक, मालक, किन्नर यांच्या आरोग्याच्या बाबतीत काम करण्यात येणार आहे. प्रशासनाला वाहतूक समस्येबाबत मदत करणार असल्याचे नवनिर्वाचित शिरूर तालुका वाहतूक सेना अध्यक्ष गोविंद ज्ञानेश्वर ढेरंगे यांनी सांगितले.

 

कोरेगाव भीमा, ता. शिरूर येथील गोविंद ज्ञानेश्वर ढेरंगे यांच्या कार्याची दखल घेत त्यांची शिरूर तालुक्याच्या वाहतूक सेनेच्या तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती शिवसेनेचे नेते संजय सातव पाटील व जिल्हा सल्लागार अनिल काशीद यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देत करण्यात आली.
यावेळी नियोजन समिती पुणे जिल्हा संजय सातव, वाहतूक सेना प्रमुख पुणे जिल्हा युवराज दळवी, सल्लागार पुणे जिल्हा अनिल काशीद, राजेंद्र पायगुडे, उपजिल्हा प्रमुख वाहतूक सेना राजेंद्र तांबे, कोरेगाव भीमा शिवसेना शाखा प्रमुख संग्राम ढेरंगे, केतन ढगे, रोहित ढेरंगे मान्यवर उपस्थित होते .

गोविंद ढेरंगे यांच्या नियुक्तीने कोरेगाव भीमा परिसरात शिवसेनेची ताकद वाढली असून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये पक्षाच्या आदेशाने भरीव कामगिरी करणार असल्याचे शिवसेनेचे पुणे जिल्हा सल्लागार अनिल काशीद यांनी यावेळी सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close