प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने रावगांव येथे शालेय विद्यार्थ्यांसोबत महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कु. रुद्रा पप्पू पवार या शालेय विद्यार्थ्याच्या हस्ते क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष रामदास कांबळे यावेळी बोलताना म्हणाले की, प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठान हे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांची जयंती शालेय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन साजरी करत आहे. शालेय विद्यार्थ्यांना महामानवांचे कार्य त्यांचे जीवन माहित होणे गरजेचे आहे. आजची मुले मोबाईलचा जास्त वापर करतात, त्यामुळे वाचन संस्कृती लोप पावू लागलेली आहे. या शालेय विद्यार्थ्यांना समजणे गरजेचे आहे की, आज जे शिक्षण आपल्याला सहज उपलब्ध होत आहे. त्यासाठी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना खूप मोठा त्याग करावा लागला. त्या काळच्या सनातनी लोकांकडून खूप अन्याय, अत्याचार व अपमान सहन करावा लागला म्हणून आत्ताच्या पिढीला महापुरुष व त्यांचे कार्य समजणे अत्यंत गरजेचे आहे.
यावेळी शितल कांबळे, समाधान पवार, नाना पवार, प्रयाग कांबळे, प्रेरणा कांबळे, ओम पवार, सोहम जाधव, राजरत्न कांबळे, रणवीर कांबळे, रुद्रा पवार, राहुल पवार आदी सर्व विद्यार्थी व पदाधिकारी उपस्थित होते.



