-->
करमाळाराज्यविशेष

‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम राबविण्या संदर्भात ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांची बैठक संपन्न

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत केम जिल्हा परिषद गटातील सर्व गावचे ग्रामसेवक व सर्व मुख्याध्यापक यांची आढावा बैठक केम जिल्हा परिषद शाळेत माननीय अध्यक्ष जिल्हा परिषद सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रम राबविण्यास संदर्भात मुख्याध्यापक व ग्रामसेवक यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. साईनाथ देवकर केंद्रप्रमुख कंदर व दत्तात्रय रंदवे गुरुजी मुख्याध्यापक घोटी यांनी केले. श्री. महेश्वर कांबळे केंद्रप्रमुख केम यांनी ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ व मनेरगा तून करावयाची कामे याविषयी माहिती सांगितली. सुरुवातीला अध्यक्षांच्या हस्ते सावित्रीमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी करमाळा पंचायत समिती ज्युनियर इंजिनिअर पाटील साहेब, देवकर साहेब, कृषी खात्याचे कृषी पर्यवेक्षक सुहास पोळके साहेब, अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक श्री सूर्यकांत मोहिते भाऊसाहेब, साडे केंद्राचे केंद्रप्रमुख वसंत बदर सर, सालसे केंद्राचे केंद्रप्रमुख दामाजी श्रीरामे सर, केम शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक भाऊराव तळेकर गुरुजी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी म्हेत्रे साहेब उपस्थित होते.

यावेळी केम गावचे ग्राम विकास अधिकारी सातव भाऊसो यांनी मनेरगा तून करावयाच्या कामाविषयी त्यांच्या अडी अडचणी सांगितल्या व कशा प्रकारे कामे करता येतील याविषयी मार्गदर्शन केले. साडे केंद्राचे केंद्रप्रमुख वसंत बदर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षक नेते श्री. काळे गुरुजी यांनीही ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांच्या समन्वयातून कशी कामे करता येतील याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर अनेक मुख्याध्यापकांनी आपल्या अडी अडचणी मांडल्या व शाळा स्वच्छ व सुंदर झाल्या पाहिजेत असे सांगितले. गटातील जी शाळा तालुक्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवेल त्या शाळेला माझ्या एक महिन्याच्या पगाराचे बक्षीस देऊन त्या मुख्याध्यापकाचा व ग्रामसेवकाचा सत्कार करण्यात येईल, असे जाहीर केले. शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close