-->
करमाळाराजकिय

वंचित बहुजन आघाडी जनतेच्या हक्कासाठी व अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी कटिबद्ध : जिल्हा महासचिव निलेश वामने

 

कोरेगाव भीमा प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडी ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर काम करणारा पक्ष अजून सर्व समाज घटकांना एकत्र घेऊन सर्वांसोबत वाटचाल करणारा, सर्वांना समान न्याय देणारा व अन्यायाविरुद्ध लढा देणारा पक्ष आहे. म्हणून आम्ही सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी व अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नवनिर्वाचित पुणे जिल्हा महासचिव निलेश वामने केले.

पेरणे फाटा, ता. हवेली येथील वंचित बहुजन आघाडी कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा वंचित बहुजन आघाडीचे पूर्व पुणे जिल्हा अध्यक्ष विनोद भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भालेकर यांनी वंचित बहुजन आघाडी हा समाजातील शोषित लोकांवरील अन्यायाला वाचा फोडणारा पक्ष आहे. येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीने उतरेल असे मत भालेराव यांनी यावेळी व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियम पाळत संपर्क कार्यालयाचे लोकार्पण करण्यात आले.

यावेळी टायगर ग्रुप पुणे जिल्हा अध्यक्ष केशव राखपसरे, पेरणेचे माजी सरपंच आनंदा टुले, शरद माने, बाबू लोंढे, ग्रा. सदस्या मंगल वामने, कोमल वास्मिक, माजी सरपंच आनंदा टुले, संजय साळवे, वंचितचे पदाधिकारी प्रसिद्धी प्रमुख वंचित पुणे जिल्हा संतोष सरोदे, जिल्हा अध्यक्ष कमलेश उकरंडे, प्रसिद्धी प्रमुख पश्चिम पुणे जिल्हा संजय गायकवाड, उपाध्यक्ष पुणे जिल्हा हिरामण वाघमारे, अध्यक्ष अण्णाभाऊ साठे ग्रुप भाऊ लोंढे, सतीश रोकडे, सोमनाथ घोरपडे, सोमनाथ फासगे, सोमनाथ धुरांधरे, अप्पा साळवे , गंगाधर राजगुरू, सुनील नवगिरे, सचिन इंद्रेकर, सुनील वाघमारे, बाळू वाघमारे, महानगर पालिका कामगार आघाडी अध्यक्ष संदीप पाटोळे, मीना लोंढे, विठाबाई लोंढे, लक्ष्मी देवगिरे, मंगल चव्हाण, माया गवळी, दिगुबाई वाघमारे, गंगाबाई वाघमारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे आभार ग्रामपंचायत सदस्या मंगल वामने यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close