-->
आरोग्यकरमाळासामाजिक

आ.संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘या’ गावामध्ये वृक्षारोपण व लसीकरण शिबिर उत्साहात संपन्न

केम प्रतिनिधी : संजय जाधव

करमाळा तालुक्यातील निंभोरे येथे दिनांक ३० जुलै २०२१ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या लसीकरण शिबिरामधे निंभोरे येथील नागरिकांनी दुसरी लस घेतली. साधारण २०० डोस यामध्ये उपलब्ध करण्यात आले होते.

यासाठी गावचे होतकरू तरुण आणि सामाजिक कार्यकर्ते रविभाऊ वळेकर यांनी प्रयत्न केले आणि लसीकरण सुरळीत व यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. कोरोना पुन्हा एकदा वाढत असताना लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. त्या दृष्टीने गावामध्येच लसीकरण शिबिर आयोजन करावे अशी गावातील नागरिकांची मागणी होती. त्या अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वळेकर यांच्या प्रयत्नाने आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्ताने लसीकरण शिबीर आणि वृक्षारोपण काम पूर्ण केले.

या लसीकरण शिबिरासाठी वैद्यकीय तज्ज्ञांनी उपस्थित राहून नागरिकांना लसीकरणाचे महत्व पटवून देऊन लसीकरणानंतर कोणताही त्रास होणार नाही असा विश्वास दिला. नागरिकांनी योग्य सामाजिक अंतर ठेवून लसीकरण शिबिरासाठी सहकार्य केले आणि आजचा कार्यक्रम यशस्वी झाला।
सदर कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निभोरे आणि धर्मवीर संभाजी विद्यालय निंभोरे येथील सर्व सहशिक्षकांनी आणि आशा वर्कर यांनी मोलाचे सहकार्य केले.

तसेच सुतार भाऊसाहेब, दिलीपराव मुळे, रामचंद्र घुटके, ज्ञानेश्वर वळेकर, नाथाभाऊ शिंदे, पोलीस पाटील पन्हाळकर व आर.व्ही. ग्रुप चे पदाधिकारी यांनी सहकार्य केले. तसेच हे लसीकरण डाॅ.अभिजीत बागडे, निलेश कुबेर, शीतल घायाळ यांनी केले. हे शिबीर शांततेने पार पडले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close