-->
आरोग्यकरमाळा

आ.संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वडगांव येथील कोविड लसीकरण शिबिर संपन्न

 

करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

आज शुक्रवार दि. ३० जुलै रोजी करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या शिफारसीनुसार तसेच प.स. सदस्य अँड. राहुलभाऊ सावंत, सामाजिक कार्यकर्ते सुजीत तात्या बागल व सी.ए. लहू काळे यांच्या प्रयत्नातुन वडगांव दक्षिण येथे कोविड लसीकरण शिबिरचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना हनुमंत काळे म्हणाले की, आमच्या गावातील नागरीकांना कोविड ची लस घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र साडे येथे जावे लागते. साडे हे गाव आमच्या गावापासून 30 किमी अंतरावर आहे. लस घेण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिकाला साडे येथे जाणे शक्य होत नव्हते. परंतु आमदार संजय मामा शिंदे, ॲड. राहुल सावंत व सुजित तात्या बागल तसेच वडगाव ग्रामपंचायतीने गावातील लोकांना गावातच लस उपलब्ध करून दिल्याने नागरिकांची लसीकरणासाठी होणारी गैरसोय टळली आहे. गावातील नागरिकांनीही लसीकरणासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या लसीकरण शिबिरामध्ये १५० लोकांनी लसीकरण करून घेतले.

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा

 

यावेळी शिबिर यशस्वी करण्यासाठी शिक्षक देवेंद्र जाधवर, मणेरी गुरुजी, अंगणवाडी सेविका माया काळे, स्वाती अंधारे, अश्विनी शिंदे, आशा वर्कर्स सोनाली अंधारे, ग्रामपंचायत शिपाई बाळू शिंदे व साडे PHC सेंटर चे डॉक्टर व नर्स यांचे सहकार्य लाभले. तसेच गावातील ईश्वर वस्ताद भांडवलकर, भाऊसाहेब काळे, मयुर गाडे, महादेव रोडगे, विलास रोडगे, फैय्याज पठाण व वडगाव ग्रामस्थ यांचेही विशेष सहकार्य झाले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close