-->
करमाळागड किल्ले

प्रवास गडकिल्ल्यांचा ध्यास दुर्ग संवर्धनाचा ; राजधेर

राजधेर ( Rajdher )

किल्ल्याची ऊंची :  3555

नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक रांग सुरगणा पासून चालू होते आणि चांदवड पर्यंत येऊन संपते. पुढे तीच मनमाडच्या जवळ असणार्‍या अंकाईच्या पर्यंत जाते. याच रांगेला अजंठा – सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात राजधेर,कोळधेर,इंद्राई आणि चांदवड हे ४ किल्ले येतात.

पहाण्याची ठिकाणे :राजधेर किल्ल्यावर प्रवेश करतांना पहिल्या प्रवेशद्वाराच्या डावीकडच्या कमानीवर एक फारसीतील शिलालेख आहे. येथून गडमाथ्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात. गडमाथ्यावर पोहोचल्यावर समोरच दोन वाटा फुटतात. एक डावीकडे जाणारी तर दुसरी उजवीकडे जाणारी. आपण उजवीकडची वाट पकडायची , थोडे पुढे गेल्यावर एक वाडा लागतो. आजही वाडा चांगल्या स्थितीत उभा आहे. या वाड्या शिवाय येथे बघण्यासारखे काही नाही. परत फिरून आता डावीकडची वाट पकडायची. या वाटेवरून थोडे पुढे गेल्यावर एक कातळात खोदलेली गुहा लागते. या गुहेत उतरण्यासाठी एक शिडी लावलेली आहे. येथे सध्या एका बाबांचे वास्तव्य असते. गुहेच्या वरच्या भागावर एक घुमटाकार कमान असलेली विहीर आहे. येथून परत थोडे पुढे गेल्यावर आणखी एक गुहा लागते. या गुहे समोरून पुढे जाणारी वाट तलावापाशी घेऊन जाते. तलावाच्या काठावर एका गुहेत महादेवाचे मंदिर आहे. तलावाच्या कडेकडेने जाणार्‍या वाटेने आपण डोंगरमाथ्यावर पोहोचतो. वाटेत अनेक भुयारी टाकी आढळतात. गडाच्या सर्वोच्च माथ्यावर एक तलावआहे. गडमाथ्यावरुन मांगीतुंगी, न्हावीगड ,कोळधेर ,इंद्राई, धोडप असा सर्व परिसर दिसतो. गडमाथा फिरण्यास २ तास लागतात. उतरण्यासाठी एक शिडी लावलेली आहे.

पाण्याची सोय :किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याची टाकी आहेत.

 

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close