करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निवड कार्यक्रम करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात पार पडला. यावेळी श्री देवीचा माळ येथील राजेंद्र पवार यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोशल मीडिया तालुकाध्यक्ष पदी निवड झाली. यावेळी आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते नूतन अध्यक्ष राजेंद्र पवार यांचा सत्कार करून निवडीचे पत्र देण्यात आले. सदर निवड कार्यक्रम हा आमदार संजय मामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाला.

यावेळी उद्धव दादा माळी, तानाजी बापू झोळ, सुजित तात्या बागल, दादासाहेब सावंत, वीटचे सरपंच उदय ढेरे, युवराज गपाट, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस गौरव झांजुर्णे, जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष आशपाक जमादार, राष्ट्रवादी युवक करमाळा तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, करमाळा शहराध्यक्ष तोसिफ सय्यद यावेळी उपस्थित होते.



