-->
करमाळाराजकिय

करमाळा तालुका युवक राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या निवडी आ.संजय मामा शिंदे यांच्या हस्ते संपन्न

 

 

करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या करमाळा येथील संपर्क कार्यालयात आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी तुषार शिंदे, लक्ष्मीकांत पाटील व सुरज ढेरे तर सोशल मीडिया अध्यक्षपदी राजेंद्र पवार, कार्याध्यक्षपदी रोहित राऊत, तसेच राष्ट्रवादी करमाळा शहर कार्याध्यक्षपदी अभिषेक पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस युवती उपाध्यक्षपदी अनिता भिवा सरक यांच्या निवडी करण्यात आल्या.

यावेळी बोलताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नूतन तालुका उपाध्यक्ष तुषार शिंदे म्हणाले की,पक्ष बळकटीसाठी, पक्ष वाढीसाठी तसेच पक्षाची ध्येय व धोरणे आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार तळागाळापर्यंत आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही जोमाने कार्य करणार आहे.

 

सदर निवडी वेळी उद्धव दादा माळी, तानाजी बापू झोळ, सुजित तात्या बागल, दादासाहेब सावंत, वीटचे सरपंच उदय ढेरे, युवराज गपाट, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस गौरव झांजुर्णे, जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष आशपाक जमादार, राष्ट्रवादी युवक करमाळा तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, करमाळा शहराध्यक्ष तोसिफ सय्यद यावेळी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close