-->
करमाळा

आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे- माजी जि.प.उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड

 

करमाळा प्रतिनिधी/ ऋषिकेश चव्हाण

 

आई वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करून आपले उद्दिष्ट साध्य करावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी केले. आज ग्रामीण भागातील दहावीच्या परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करमाळा तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात घेण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरी उपस्थित होते.

 

यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, सचिव नासीर कबीर, खजिनदार अशोक नरसाळे, पत्रकार शंभूराजे फरतडे, सिद्धार्थ वाघमारे, दिनेश मडके, सचिन जव्हेरी, नागेश शेंडगे आदी पत्रकार उपस्थित होते. यावेळी आदित्य मरळ, सारिका मोरे, आदित्य आगलावे, अक्षय मरळ, कृष्णा राऊत, युवराज बारकुंड, अमृता सरडे, संध्याराणी मरळ या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

 

या पार्श्वभूमीवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मिळवलेले हे यश कौतुकास्पद असल्याचे सांगत सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरी पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा सुद्धा विचार करून तहसिलदार, जिल्हाधिकारी अशा प्रकारच्या सेवेत कार्यरत होऊन देशाची व समाजाची सेवा करण्याचे उद्दिष्ट ठेवले तर ते निश्चितच कौतुकास्पद राहील. ग्रामीण भागातील मुले आता स्पर्धा परीक्षेत मोठ्या प्रमाणावर यशस्वी होत असून त्याच्या पावलावर पाऊल ठेवूनच चिखलठाण गावातील विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे असे आवाहन केले. शेवटी प्राध्यापक अशोक नरसाळे सर यांनी आभार मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close