केम प्रतिनिधी


करमाळा तालुक्यातील केम येथे कोरोनामुळे मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत श्री उत्तरेश्वर देवस्थानचे महाराज गिरी जयंत महाराज यांच्या कुटी समोर असलेल्या मारूती मंदिरा समोरील पटांगणात गुरू पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सुरूवातीला सकाळी ९ ते ११ या वेळेत हरिभजनाचा कार्यक्रम झाला. तसेच विद्यागीरी महाराज यांच्या प्रतिमेवर गुलाल व पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर कुंभार महाराज यांनी शंकराची, दत्ताची आरती केली. या वेळी जयंत गिरी महाराज, रामेश्वर महाराज, रघुनाथ महाराज यांचे भाविकांनी गुरू दक्षिणा देऊन व दर्शन घेऊन महारांचा आशीर्वाद घेतला.
या धार्मिक कार्यक्रमासाठी श्री उत्तरेश्वर देवस्थानचे चेअरमन दादासाहेब गोडसे, सदस्य मनोज सोलापूरे, भाऊसाहेब बिचितकर, ह.भ.प. मारूती पळसकर, ह.भ.प. कोळी महाराज, ह.भ.प. थिटे महाराज, रमेश तळेकर, शिवाजी तळेकर, भगवान देवकर, उत्तम जाधव, ऊत्तरेश्वर तळेकर, राजेंद्र बिचितकर, ज्ञानेश्वर पळसे, मोहन काळे, बबलू पाटील, सोमा खंदारे, आणा वाळेकर, नामदेव वाळेकर, दिलीप खाडे, नाना महाराज, नारायण टोपे, अशोक गुरव, काशिद संदिप गोडसे राहुल कोरे, नारायण देवकर, हनुमंत राऊत, सोमा खंदारे, माऊली तळेकर, राजेंद्र भिताडे, पत्रकार संजय जाधव, बिचितकर, रेशन दुकानदार प्रदिप वास्कर, विठाबाई, स्वाती वाळेकर,आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
आलेल्या भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला. गतवर्षी प्रमाणे याही वर्षी मोजक्याच भाविकात ही पौर्णिमा साजरी करण्यात आली. जयंत गिरी महाराजांचे शिष्य या कार्यक्रमासाठी मुंबई हून आले होते. महाराजांचे सर्व भागात शिष्य आहेत. त्यांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दररोज चहा दिला जातो. जयंत गिरी महाराज केम ला आल्यापासून या मंदिराला रोषणाई आली आहे. ज्ञानेश्वर माऊली या भाविकाने महाराजांच्या मठासाठी एक एकर जमिन दान केली आहे.




