देवळाली, खडकेवाडी गावांसाठी दहिगाव उपसा सिंचन उपचाऱ्यांचे काम व्हावे ‘यांनी’ केली आ. संजय शिंदे यांच्याकडे मागणी
करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या देवळाली व खडकेवाडी या गावांसाठी दहिगाव उपसा सिंचनच्या उपचाऱ्यांचे काम लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी देवळालीचे युवा सरपंच आशिष गायकवाड यांनी आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सदर निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दहिगाव उपसा सिंचनाद्वारे चालू असलेल्या कॅनॉलच्या उपचाऱ्यांनी देवळाली व खडकेवाडी येथील बरेच क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तरी देवळाली व खडकेवाडी या भागातील उपचाऱ्यांचे काम आपल्या स्तरावरून लवकरात लवकर करावे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.
यावेळी माजी सरपंच बिभीषन गव्हाने, बंडु शेळके, माजी सरपंच संतोष गायकवाड, ग्रा. पं. सदस्य पोपट बोराडे, प्रकाश कानगुडे, चेअरमण संजय कानगुडे, संदीप गायकवाड, सतिश गायकवाड, बापु गुंड, ज्योतीराम गुंड, परमेश्वर चव्हाण आदी उपस्थित होते.




