-->
करमाळाराजकिय

शिवसेनेच्या “गाव तिथे शाखा” उपक्रमांतर्गत करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात शिवसेना महिला आघाडीच्या शाखेचे उद्घाटन

केम प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील केम गणातील वडशिवणे येथे शिवसेना महिला आघाडी शाखेचे उद्घाटन झाले. या शाखेचे शाखाप्रमुख म्हणून भाग्यश्री पवार यांची निवड करण्यात आली. सुरुवातीला हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करमाळा तालुका शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा वर्षा चव्हाण मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन प्रसंगी चव्हाण मॅडम म्हणाल्या की, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिव संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने वडशिवणे येथे शाखा काढण्यात आली आहे. शिवसेना पक्ष वाढीसाठी व आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्यासाठी गाव तिथे शाखा व घर तेथे शिवसैनिक हि संकल्पना आम्ही हाती घेतली आहे. आज वडशिवणे येथे शाखेचे उद्घाटन करून सदस्यांची नोंदणी केली आहे. शिवसेना सदस्यांनी कोरोना काळात झालेले लसीकरण व रेशन दुकानातून गोरं गरिबांना धान्य मिळाले का याचा आढावा घेणे, जनतेच्या अडचणी सोडविणे, तसेच गावातील काही अडचणी असतील त्या आमच्या पर्यंत पोहचविणे जेणेकरून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देता येईल. आपण बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत. आपण गट, तट न पाहता शिवसेनेसाठी काम करायचे आहे असे प्रतिपादन चव्हाण मंडम यांनी केले.

याप्रसंगी वैशाली पवार, जयश्री जाधव, संगीता सावंत, लक्ष्मी पन्हाळकर, रूपाली सावंत, राधाबाई पन्हाळकर, माया सावंत, स्वाती शिंदे, ज्योती सावंत, शोभा भागवत, माधुरी पवार, सुमन पवार, सुनीता भागवत, पूजा टकले, सुमन कळसाईत आदी महिला उपस्थित होत्या.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close