केम प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील केम येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री उत्तरेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र नांगरे यांना “कलासाधना सामाजिक संस्था मुंबई” या संस्थेचा “आदर्श शिक्षक” पुरस्कार निवड झाली आहे.


डॉक्टर मच्छिंद्र नांगरे सर यांनी उत्तरेश्वर संस्कृती केंद्र स्थापन केले. दर शनिवारी संबंधित असलेले सांस्कृतिक उपक्रम, निबंध लेखन, भाषण उपक्रम, सर्वात महत्त्वाचे म्हणजे दरवर्षी शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे साहित्यसंमेलन, स्वच्छता अभियान, आरोग्य आपल्या दारी, वाचन कट्टा हे सर्व उपक्रम या निवड समितीला खूप आवडले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विश्वस्त मुलीने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर मिळवलेले उत्तुंग यश परिपाक या उपक्रमामुळे या पुरस्कारासाठी निवड झाली.
या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, कार्यकुशल सचिव प्राचार्य सौ शुभांगी ताई गावडे, प्रशासन सहसचिव डॉक्टर युवराज भोसले, अर्थ सचिव डॉक्टर राजेंद्र शेजवळ, मराठवाडा विभाग प्रमुख सेवक डॉक्टर जयसिंगराव देशमुख, प्राचार्य कदम सर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व केम केंद्राचे केंद्रप्रमुख महेश कांबळे, गटशिक्षणाधिकारी भोंग साहेब, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे , माजी सरपंच अजित दादा तळेकर, प्रहार संघटनेचे ता. प्रमुख संदिपान तळेकर,सागर दौंड, बाळू ननवरे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र नांगरे सर यांनी श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा लावला आहे. त्यामुळे या विद्यालयाची मान उंचावली आहे.
या विद्यालयाचे केम परिसरातून कौतुक केले जात आहे




