-->
करमाळाराजकियराज्यसामाजिक

लोणकर कुटुंबीयांना अतुल खूपसे यांची सांत्वनपर भेट; सरकारकडून ५० लाख रुपये मदतीची मागणी

स्वप्नीलच्या वडीलांना सरकारी नोकरीत रुजू करावे; जनशक्ती संघटनेचे प्रदेशअध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांची मागणी ...अन्यथा मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन छेडन्याचा इशारा

माय मराठी न्युज प्रतिनिधी

एमपीएससी परीक्षेत पास झालेला विध्यार्थी स्वप्नील लोणकर यांनी आत्महत्या केली आणि सर्व महाराष्ट्र हळहळला. घरची परिस्थिती अगदी हलाकीची असताना सुद्धा स्वप्निल लोणकरला एमपीएससी परीक्षेत पास होऊन देशाची, राज्याची सेवा करायची होती. देशाची सेवा करायची हे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या स्वप्निल लोणकर या तरुणाने सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नाईलाजास्तव आत्महत्या करून आठ दिवसापूर्वी आपले जीवन संपवले. एमपीसी पास होऊनही आपल्याला नियुक्ती दिली जात नाही आणि घरावर झालेला कर्जाचा डोंगर फेडण्यासाठी आपण आई-वडील यांना मदत करू शकत नाही, यामुळे स्वप्नील या विद्यार्थ्यांनी स्वतःचे जीवन संपवत बाकीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी चिठ्ठी लिहून ठेवली. परंतु दुर्दैव म्हणाव लागेल की, स्वप्नील लोणकरच्या आत्महत्या नंतरही महाआघाडीतील व राज्यातील एकाही आमदार, खासदार किंवा मंत्र्याने त्याच्या परिवाराला साधी भेट सुद्धा दिली नाही. मात्र महाराष्ट्रभर शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब लोकांसाठी, विध्यार्थीच्या प्रश्न जाणून घेण्यासाठी, अन्याय अत्याचारला वाचा फोडण्यासाठी फिरनारे शेतकरीपुत्र जनशक्ती शेतकरी संघटनेचे प्रमुख अतुल खुपसे पाटील यांनी स्वप्नील लोणकर यांच्या केडगाव चौफुला येथील राहत्या घरी जाऊन भेट दिली व लोणकर यांच्या कुटूंबाचे यावेळी सात्वन केले.

यावेळी स्वप्नीलच्या वडिलांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. त्याने लहानपणा पासून केलेली सामाजिक कार्य आणि त्याच्या सर्व अपेक्षाचा पाडा स्वप्नील लोणकरच्या वडिलांनी ढसा ढसा अश्रू गाळत वाचून दाखवला. स्वप्निलने २८ वेळा प्लाजमा दान केला होता. अनेक वेळा रक्तदानही केले. पोलीस मित्र म्हणून पोलिसांना पण मदत करण्याचे काम त्यांनी केले. जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न तो पाहत होता परंतु सरकारच्या नाकर्तेपणामुळे मानसिक त्रासाने त्याने आत्महत्या केली. स्वतःला संपवून घेतले आणि नंतर शासनाला जाग आली.

याप्रसंगी अतुल खूपसे यांनी गोपीचंद पडळकर यांना फोनवरून संपर्क साधला. स्वप्निलच्या वडिलांचे आणि गोपीचंद पडळकर यांचे बोलने करून दिले. आत्तापर्यंत त्यांच्याकडे त्याच्या कुटूंबाची भेट घेण्यासाठी प्रशासनाचा आणि सरकारमधील अधिकारी किंवा मंत्री भेटायला सुद्धा आला नाही याची खंत स्वप्नील च्या वडिलांनी बोलून दाखवली.

या प्रसंगी जनशक्तीचे अतुल खूपसे म्हणाले की, स्वप्नील लोणकर यांची ही आत्महत्या नसून मुर्दाड व्यवस्था व महाविकास आघाडी सरकारने केलेली हत्या आहे. दरम्यान सरकारला ३१ जुलै पर्यंत एमपीएससी पास झालेल्या ४१३ विद्यार्थ्यांची नियुक्ती दिली नाही तर जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन छेडन्याचा इशारा ही दिला आहे. यावेळी गणेश ढोबळे, राहुल वाघे, कल्याण गवळी व इतर जनशक्ती संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close