-->
करमाळासामाजिक

करमाळा येथे मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात शस्त्रक्रिया शिबिर

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

आनंदऋषी नेत्रालय आणि श्री. कमलादेवी ऑप्टिकल्स, करमाळा यांचे संयुक्त विद्यमाने
मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्रक्रिया शिबिर करमाळा येथे आयोजित करण्यात आले आहे.

करमाळा येथे श्री. सुरेश चाळक यांचे गेली १८ वर्ष श्री. कंमलादेवी ऑप्टिकल नावाने दुकान आहे. ते अनेक सामाजिक उपक्रम राबवून नेत्र रुग्णांना सेवा देत आले आहेत. मोफत नेत्र तपासणी, वाजवी दरात चष्मे बनऊन देणे, त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा नेत्रतज्ञ डॉ. रामानंद चाळक हे पण नेत्र तपासणी करून डोळ्यांचे विकार असणाऱ्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन करून वाजवी दरात त्यांचं ऑपरेशन कसे होईल याचा सल्ला देतात.

सदर शिबिर हे रविवार दिनांक १८ जुलै २०२१ रोजी छत्रपती चौक, नगर पालिका शॉपिंग सेन्टर, दत्त पेठ, करमाळा येथे आयोजित केले आहे. बिनटाक्याची मोतीबिंदू शस्रक्रिया ही फक्त २२०० रुपये औषध व लेन्स खर्चासहित व फेको पद्धतीने शस्रक्रिया फक्त ५७०० रुपये औषध व लेन्स खर्चासहित करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील डोळ्यांचे विकार असणाऱ्या गरजूनी आजच नोंदणी करून याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सुरेश चाळक यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close